मनोरंजन विश्व हादरलं
सुशांतनंतर आणखी एका टीव्ही अभिनेत्यानं केली आत्महत्या
मुंबई, 08 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून त्याचे चाहते सावरले नाहीत, तोपर्यंत मनोरंजन विश्वातील आणखी अभिनेत्याने आत्महत्या केली आहे. टेलिव्हिजन अभिनेता सुशील गौडा ने त्याच्या घरी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्याच्या जाण्याने टेलिव्हिजन विश्व, त्याचे चाहते आणि कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का होता. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. त्याने 'अंतपूरा' या रोमँटिक मालिकेमध्ये काम केले होते.