डी. एस. कराड आय इन्स्टिटयुटच्या वतीने निर्धन रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया सुविधा सुरु
गरजू रुग्णांनी मोफत नेत्र सेवेचा लाभ घ्यावा - नेत्र तज्ज्ञ डॉ. हनुमंत कराड यांचे आवाहन
लातूर, दि. 23 – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरीब व गरजू लोक नेत्रसेवेपासून वंचित राहू नयेत यासाठी लातूर येथील नेत्र प्रतिष्ठान संचलित डी. एस. कराड आय इन्स्टिटयुटच्या वतीने दारिद्य रेषेखालील, निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांची नेत्र तपासणी व मोतीबींदु, काचबिंदु, तिरळेपणा, नासुर अशा शस्त्रक्रिया मोफत करण्यात येत आहेत, अशी माहिती डी. एस. कराड आय इन्स्टिटयुटचे कार्यकारी संचालक नेत्र तज्ज्ञ डॉ. हनुमंत कराड यांनी दिली.
या सुविधेंतर्गत डी. एस. कराड आय इन्स्टिटयुट, कळंब रोड, एमआयडीसी लातूर येथे रुग्णांची नेत्र तपासणी, अग्दी डोळयांच्या आतील पडद्याची तपासणी, काचबिंदु, मोतीबिंदु, तिरळेपणा, नासुर या डोळयांच्या आजारांची तपासणी, नेत्र तपासणी करुन डोळयांचे नंबर काढणे व डोळयांच्या विविध आजारासबंधी तपासणी करुन मोफत उपचार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी नोंद केलेल्या दारिद्रय रेषेखालील, दुर्बल घटकातील व निर्धन रुग्णांच्या डोळ्यातील मोतीबींदु व काचबिंदुची मोफत शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया सुविधेंतर्गत 85 हजार रुपयापर्यंत वार्षीक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांना पुर्णपणे मोफत नेत्र सेवा देण्यात येणार असून 85 हजार ते 1 लाख, 60 हजार रुपये एवढे वार्षीक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांना 50 टक्के मोफत रुग्ण सेवा पुरविण्यात येत आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी पिवळे रेशन कार्ड, 85 हजार रुपये व 1 लाख, 60 रुपये पर्यंतचा सक्षम अधिकाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला, डिआरडी प्रमाणपत्र यापैकी एक मुळ कागद प्रमाणपत्र, फोटो व औळखपत्र सोबत आणावे. सदरील नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया सुविधेचा गरजु रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डी. एस. कराड आय इन्स्टिटयुटचे कार्यकारी संचालक नेत्र तज्ज्ञ डॉ. हनुमंत कराड यांनी केले आहे.