Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर 128 व्यक्तींच्या स्वाबपैकी 104 निगेटिव्ह, 15 पॉझिटिव्ह तर 09 अनिर्णित

लातूर 128 व्यक्तींच्या स्वाबपैकी 104 निगेटिव्ह, 15 पॉझिटिव्ह तर 09 अनिर्णित 


 


आज रुग्णालयातून 12 रुग्णांना डिस्चार्ज तर उदगीर येथील एका रुग्णाचा मृत्यू*


लातूर, दि.25(जिमाका):- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक 25 जून 2020 रोजी एकूण 128 व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते. त्यापैकी 104 अहवाल निगेटिव्ह, 15 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर 9 व्यक्तींचे आवाहल अनिर्णित आले आहेत.
        विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे  एकूण 68 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 55 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून , 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व  03 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या  *04 व्यक्ती वाल्मिकी नगर लातूर येथील आहेत व माऊली नगर, विठ्ठल नगर, विवेकानंद चौक, आझाद चौक, एम. आय. डी. सी. लातूर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे व सारोळा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे*,
अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर व  यांनी दिली.
   तसेच उपजिल्हा रुग्णालय *उदगीर येथील 03 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून पॉझिटिव्ह  आलेल्या व्यक्ती रावणगाव 1, नई आबादी 1 व चौबुरा जवळील 1 असे आहेत. तर अहमदपूर येथिल 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती धानोरा येथील आहेत*, अशी माहिती डॉ. संजय ढगे यांनी दिली आहे.
    विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील काल पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या निवासी डॉक्टराच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तीच्या स्वबची तपासणी केली असता त्या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती  अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.
                       
*आज 12 रुग्णांना रुग्णालयातुन सुट्टी*


       लातूरासाठी सलग दुसरा दिवस दिलासादायक ठरला आहे. आज लातूर जिल्ह्यातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 7,   उपजिल्हा रुग्णालय निलंगा 1 व उपजिल्हा रुग्णालय उदगीर 4 अशा एकूण 12 रुग्णांना त्यांची प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
      विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आज बाभळगाव 3, मोतीनगर 1, जुनी कापड लाईन 2 व भुसार लाइन 1 असे 7 रुग्ण तर उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथून 1 तसेच उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील किंनी  3 व नोबेल कॉलनी 1 असे 4 याप्रकारे लातूर जिल्ह्यातून 12 रुग्णांना त्यांची प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे डॉ. ढगे यांनी सांगितले. तर आज उदगीर  येथे एका 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झालेला असून त्या रुग्णास मधुमेह हायपर टेन्शन आजार होते.
     जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 65, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 185 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 14  इतकी आहे, अशी माहिती डॉ संजय ढगे यांनी दिली आहे.
             *********


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post