चाकूर पोलिसांची कारवाई मध्ये होते दिरंगाई
पॅरोलवर सुटून आलेल्या खूनाच्या आरोपीने दिली साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी
चाकूर-सध्या संपूर्ण महाराष्ट्रात करोनाने थैमान मांडले आहे .स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लोक आपली काळजी घेत आहेत प्रशासनही जीवाचे रान करत आहे. त्यातच आता पॅरोलवर सुटून आलेल्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या खूनाच्या आरोपी ने चक्क साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी दिली त्याच्याविरुद्ध दिलेल्या अर्जाची साधी दखलही चाकुर पोलीस स्टेशनला घ्यावीशी वाटली नाही हे विशेष
अर्जदाराने दिलेल्या माहितीनुसार 2012 रोजी शिवनखेड बुद्रुक तालुका चाकूर जिल्हा लातूर येथे शेतीच्या वादावरून मोठे यांचा खून झाला होता त्या खूनाच्या केस मध्ये शिवशंकर वसंतराव मोठे हा साक्षीदार होता, आरोपी महेश माणिकराव मोठे यास कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा दिली आहे, परंतु कोरोनाच्या या काळात त्यास पॅरोल'वर सुटका मिळाली. याचाच फायदा घेत त्याने शिवशंकर वसंतराव मोठे यास धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. हा वाद तंटामुक्ती अध्मयक्षा। समोर झाला असल्याचे सांगितले जात आहे, परंतु तिथे न मिटल्याने जिवाच्या भीतीने अर्जदाराने पोलीस स्टेशन नळेगाव येथे अर्ज दिला परंतु त्याची कसलीही दखल घेण्यात आली नाही त्यानंतर अर्जदाराने चाकुर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली, परंतु त्याही ठिकाणी त्याची दखल घेतली नाही शेवटी अर्जदार यांनी पोलीस अधीक्षक,लातूर यांना अर्ज दाखल केला, त्याही ठिकानी अर्ज दाखल करून आज बरेच दिवस उलटून गेले तरी ,पोलिस अधिक्षक यांनी याची गंभीर दखल घेवून आरोपीवर कार्यवाही करावी अशी मागणी अर्जदार करत आहे