आत्ता कोरोनाची नाही तर,सरकारची भीती वाटत आहे.
कोरोना रुग्ण अंत्यत कमी असताना लोकांचे लॉक डाऊन करून आत्यंतिक हाल शासनाने केले
या मागे त्यांच्या सदिच्छा होत्या की जागतिक महामारी पासून लोकांचे संरक्षण व्हावे
असे आपण समजत होतो ,किंवा ते गृहीतक होते ,
आज जगभरात कोरोना रुग्ण 1 कोटी लोका पर्यंत पोहचला आहे भारतात तो 5 लाखकडे सरकत आहे ,,महाराष्ट्रात तो दीड लाखाच्या जवळपास पोहचला आहे ,,
कठोर प्रशासक म्हणून ज्यांचा गौरव केला गेला ते आयुक्त तुकाराम जी मुंढे ही या कोरोना प्रसाराला आळा घालू शकले नाहीत ,
कोट्यवधी भारतीय नागरिकांना घरात बसवून कोणताच देश त्याचे पालनपोषण करू शकत नाही ,हे वास्तव सरकारला ही माहीत होते ,,
भारतासारख्या आर्थिक दुर्बल राष्ट्रा साठी तर ही बाब अतिशय अवघड व अश्यक्य प्राय होती ,,
तरीही भारत सरकारने हा लॉक डाऊन लोकांवर लादला व तो आता कोरोना शिखरावर पोहचलेला असताना व त्याचा धोका कम्युनिटी स्प्रेड म्हणून असताना ह्या अन लॉक च्या घोषणा झाल्या ,,
सुरुवातीच्या टप्प्यात कारखाने चालू करण्याचे आदेश दिले गेले परंतु त्यात एक ही कर्मचारी कोरोना ग्रस्त झाला तर त्याची जबाबदारी मालकावर ढकलण्यात आली व त्यास कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असे सूचित केले ,परिणामी अनेकांनी कारखाने उघडण्यास नकार दिला ,नंतर हा आदेश शिथिल करण्यात आला
दुसऱ्या बाजूने शासकीय कार्यालये 5 %लोकांना घेऊन उघडण्यास सांगितले गेले ,तेव्हा जिल्हा बंदी ही कडक होती आणि कर्मचारी कार्यालयात पोहचू शकत नव्हते
आपल्या आस्थापणातील कामगारांना कंपन्या द्वारे पगार दिला जावा असे आदेश भारत सरकारने पारित केले पण ह्याच आदेशापासून त्यांनी स्वतः ला दूर करीत ही बाब मजूर व कंपनी मालक ठरवतील तो त्यांचा अंतर्गत मामला म्हणून आपले हात वर केले
या लॉक डावूनच्या काळात स्पष्ट असे निर्देश नसल्याने ,प्रत्येक अधिकारी व अगदी ग्रामपंचायत प्रमुख ही आपापल्या मर्जी प्रमाणे 3 दिवसाचा जन कर्फ्यु घोषित करू लागले
आपण कुशल प्रशासक आहोत व कोरोना योद्धे आहोत हे दर्शवण्याची जणू अहमीकाच चालू झाली
लोक फक्त सहन करीत राहिले ,कोणतीही जनता फक्त सहनच करू शकते ,,याचे कारण ती असाह्य अशीच असते ,,
समाज म्हणून जरी ती एकत्रित असली तरी प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र म्हणजेच सुटी सुटी असते ,व तिची शक्ती फारच कमजोर असते
*पावसाने झोडपले राजाने मारले तर फिर्याद कोणाकडे करणार?*
अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे
या प्रमाणे होत गेले ,,
प्रत्येक वेळेस नवीन नियम लादले गेले ,,रिक्षा ,व प्रवासाची साधने गोठवण्यात आली ,सलून जिम बंद करण्यात आले ,,
अन लॉक केल्या नंतर कामगाराना कामावर जाणे अपरिहार्य बनले ,
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी शासनाने सार्वजनिक वाहतूक सेवा वापरली ,पण या खासगी कर्मचारी ,घर काम करणाऱ्या महिला साठी अशी कोणती व्यवस्था होती जीचा वापर करून ते कामावर पोहचणार होते? दुचाकींचा वापर फक्त एका च व्यक्तीला करता येईल हा असलाच तुघलकी निर्णय
भारतात मध्यमवर्गीय माणूस घरात फक्त दुचाकी च वापरतो ,,त्या कुटूंब प्रमुखा ला त्याच्या घरातील सदस्यांना ज्यात आई ,वडील, भाऊ ,बहीण,पत्नी ,मुले ,या पैकी कोणाला तरी कोठे ही कोणत्याही प्रयोजनासाठी घेऊन जावे लागते ,या वेळेस त्याने कोणता पर्याय निवडावा?याचे उत्तर कोणतीही यंत्रणा देत नाही ,
टॅक्सी मध्ये ही फक्त 1 प्रवाशी ?रिक्षा मध्ये 1 प्रवाशी ?हे कोणते शास्त्र काढले आहे?त्याने त्याच्या पत्नी साठी ,व त्याचे समवेत त्यांचे अपत्य असेल तर त्याचे साठी असा लवाजमा घेऊन पोहचावे का?
रिक्षा चालक व मालक यांचे भांडवल किती ?त्यांचा खर्च किती?व आमदनि किती?
या लोकांनी आपल्या रिक्षा फायनान्स काढून घेतलेल्या असतात ,कधी कधी सेकंड हॅन्ड स्वस्त मिळते म्हणून खाजगी सावकाराचे कर्ज काढून घेतलेल्या असतात ,
बँक असो वा फायनान्स त्यांना हप्ते माफ करीत नाही आणि सावकार व्याज घेतल्या शिवाय जगू देत नाही
ग्रामीण भागातील या सावकरकीची जाणीव असणारे स्व आर आर आबा सारखे गृहमंत्री ही आज हयात नाहीत ,सावकारांना कोपरा पासून ढोपरा पर्यंत सोलून काढू असे म्हणणारे शासन ही नाही ,उलट ग्रामीण राज्यकर्त्यांच्या अगलबगल मध्ये राहणारे चमचे लोक सर्व प्रकारचे अवैध धंदे आणि जनतेला पिळून काढणारे आठवडी शेकडा10%व्याज लुटणारे गुंड यांचा उत महाराष्ट्रात आलेला आहे ,,
कोणताही उद्योग नसलेले हे लोक कोट्यवधी रुपये कोठून निर्माण करतात याची चौकशी इन्कम डिपार्टमेंट ही करत नाही ,,
एकदा सर्व शासकीय सावकरकीची परवाने धारक ही तपासून बघा ,त्याचे शोषण व ती करण्याची त्यांची क्रूर पद्धत लक्षात येईल
पण ही बाब येथेच थांबत नाही ,कोरोना योद्धे म्हणून ज्याचा गौरव केला जातो ,ते पोलीस तर जनतेला फक्त छळण्या साठीच अस्तित्वात आहेत की काय इतका सावळा गोधळ चालू आहे ,
प्रत्येक गाडी अडवायची व आर्थिक तडजोड झाली नाही की ऑन लाईन दंड पावती आकारावयाची साध्य रिक्षा चालकांनी पती पत्नी व त्याचे अपत्य अशी 3 माणसे बसवली म्हणून 1000 रुपये दण्ड पावती ?ते अपत्य त्या दांपत्याने फेकून दयावयाचे का?
लोकांना त्याचे घरभाडे भरावयाचे असते ,लाईट बिल ,पाणी पट्टी ,घरपट्टी भरावयाची असते आणि स्वतः सह कुटूंबाला ही जगवावयाचे असते
याचे भान कोणी ठेवावयाचे?
सलून बंद ठेवल्या मुळे नाभिक समाजात आत्महत्या घडल्या ,,हे वास्तव आहे कोणत्याही सरकारने कोणत्याही कुटूंबाच्या घरात कोणी उपाशी आहे का हे शोधले नाही ,
सामाजिक जाणिव तीव्र असलेल्या काही राजकीय व सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनी ह्या काळात मानवी जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न जरूर केला ,पण त्यांना ही मर्यादा होत्या ,आम्ही ज्या माळशिरस तालुक्यात राहतो तेथे राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांनी धान्य बँक ही संकल्पना काढली ,ज्यात शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील गहू ,मका अशी धान्य जमा केली तर अनेक व्यापाऱ्यांनी तेल ,साबण आदी वस्तू दिल्या ,अकलूज मध्ये ,सन्मती सेवा दल ह्या जैन समाजाच्या युवकांनी माळशिरस तालुक्यासह महाराष्ट्रात असेच अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले
जनसेवा संघटने च्या वतीने ,डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली त्यांच्या टीम ने विशेषतः सौ जोती ताई कुंभार यांनी सलग 3 महिने ह्या किटचे वाटप गरजू ना केले ,,
पण ह्या बाबी ना त्यांच्या मर्यादा आहेत ,,
उत्तमराव जानकर यांना ही मी म्हणालो होतो की जिथे शासन ही अपुरे पडते तिथे तुम्ही कुठपर्यंत टिकणार?लोकांना जगण्यासाठी स्वातंत्र्य हवे असते ते शासनाने द्यावे ,,
लोकांना त्यांचे त्यांचे जीविताची काळजी असते ,
शासन म्हणून फक्त मार्गदर्शक तत्वे जाहीर करा ,व त्याची सक्ती करावयाची असेल तर ती एकतर पूर्ण जबाबदारीने करा पण या काळात त्यांच्या जगण्याची पर्याप्त सोय ही करा
लोकांनी तुम्हांला निवडून देऊन अनियंत्रित मालक म्हणून बोकांडी बसवून घेतलेले आहे काय?याचे ही एकदा उत्तर द्या
थुसीडाइस नावाचा एक ग्रीक तत्ववेत्ता होऊन गेला ,तो असे म्हणाला होता की
मे बी युवर इंटरेस्ट टू बी अवर मास्टर बट हाऊ कॅन इंटरेस्ट टू बी युवर स्लेव्ह
आमचे मालक बनणे तुमच्या हिताचे असेल ही पण तुमचे गुलाम बनण्यात आमचे कोणते हित आहे?
जनता फक्त गुलाम आहे ,व तिला आम्ही म्हणेल तसे नाचवू ,पोलीसाच्या लाठ्या खाली तिला वागवत राहू ,त्याचे जगणे अधिकाधिक मुश्किल करत राहू ,आणि सातत्याने दंडाच्या पावत्या फाडून कोट्यवधी रुपयांची वसुली करीत राहू ,कोरोना च्या काळात हातातील काम गमावून अन्नाला मोताद झालेल्या जनतेवर ,अतिरिक्त वीज बिल थोपुन त्याची वसुली करू
अरे कुठे फेडचाल हे पाप?तुमच्या सारख्या क्रूर राज्यकर्त्या साठी नरकात तरी जागा असेल का?हा मला पडलेला प्रश्न आहे
मी येथे कोणत्याच एका पक्षाचा पक्षधर नाही ,हा सामान्य माणसाचा दबलेल्या माणसाचा ,पिचलेल्या माणसाचा व पिळल्या जाणाऱ्या माणसाचा आवाज आहे
स्वातंत्र्या च्या 75 री कडे देश जात असताना ही शेतकऱ्यां साठी जमिनी स्तरावरच्या सुधारणा तुम्हांस का करता आल्या नाहीत?यांत्रिकी करणाने शेती केली जात असताना अल्पभूधारक शेतकऱ्यांना किमान पॉवर टिलर सारखी उपकरणे का देता आली नाहीत ?ज्या आधारे तो आपली शेती पिकवू शकेल ,पण त्या साठी शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा लागेल ,
ही कर्जे शेतकरी ते शासकीय आस्थापने द्वारे का वितरित होत नाहीत ?सोसायटी नावाच्या व्यवस्था राज्यकर्त्यांच्या दावणीला ठेवून शेतकऱ्यांना राज्यकर्त्यांच्या दावणीला बांधण्याची सोय का निर्माण करून ठेवली आहे?कारण तुम्हांला शेतकरी गुलाम हवा आहे ,
लोकशाहीचा बुरखा पांघरलेले राज्यकर्ते वास्तवात हुकूमशहा व जनतेचे शोषण कर्ते बनलेले आहेत ,,
हे जितक्या लवकर संपवता येईल तितके लवकर संपवा ,
आम्हांला कोरोनाची भीती वाटत नाही पण तुमची वाटत आहे
*मेलेली कोंबडी आगीला भीत नाही*
अशी म्हण आहे
सामान्य माणूस फक्त भाजलाच जात आहे म्हणून उद्वेगाने त्याला काय करावे हेच सुचेनासे झाले आहे
*नाला सोपाऱ्यात*
आपल्या दोन लहान आपत्याची गळा चिरून बापाने ही गळफास घेऊन आत्महत्या केली ,ही बातमी पाहिली आणि अंतर्बाह्य हादरलो त्या बापाची ती अगतिकता मन हेलावून गेली
*आमचा जन्म चापलुशी करण्यासाठी झालेला नाही*
*जमाना फातेहा देता है रोटीयो पर मुरदो (murdo) की तर्हा*
*हमारे वासते भेजा है ,समशेर के तुकडे*
सर्वसामान्य माणसाची बंधने पूर्णतः शिथिल करा 18 वर्षावरील व्यक्ती कायद्याने सज्ञान समजली जाते तिला पूर्णतः अज्ञानी समजून तिचे बिगर जबाबदारीचे पालकत्व शासनाने घेऊ नये ,,
तुम्ही तुमचे प्रशासन चालवा लोकांना त्याचे त्यांना जगू द्या
*फुकट चे बाप बनू नका*
तूर्त इतकेच,,,!
जय हिंद,,,,,,!
जय महाराष्ट्र,,,,,!
****************
ऍड अविनाश टी काले अकलूज
ता माळशिरस
जिल्हा सोलापूर
9960178213