मुंबईत कामावर असलेल्या व्यक्तीला रोजगार हमीच्या कामावर दाखवले
औसा तालुक्यातील तपसे चिंचोलीच्या ग्रामपंचायत चा अनागोंदी कारभार
औसा- 2014 जुलै रोजी मुंबईत कामावर असलेल्या व्यक्तीला तपसे चिंचोली च्या ग्रामपंचायत ने जुलै 2014 मध्ये चालू असलेल्या क रोजगार हमीच्या कामावर दाखवण्यात आले आहे हा प्रकार उघडकीस समोर आला.
शासनाच्या विविध योजना ह्या गावात ग्रामपंचायत मार्फत केल्या जातात ग्रामपंच्यात ही मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते पण खेडे गावचा विकास न करता ग्रामसेवक सरपंच उपसरपंच ग्रामपंच्यात सेवक व कर्मचारी हे सर्वजण ग्रामपंचायत ला आलेल्या विकास कामात घालाघोळ करून आपलीच पोळी भाजून घेण्याचे काम करतात
खेडे गावातील गोरगरिबांच्या हाताला काम मिळावे व त्यांचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून शासनाने रोजगार हमी कायदा मंजूर करून दिला आहे यात ग्रामपंचयतला आलेले बहुतांश कामे रोजगार हमी योजनेतून केली जातात पण रोजगार हमीची कामे मात्र कागदपत्रांचा मेळ घालून शासनाची व रोजगर हमीत ज्या कामगारांची नावे आहेत त्यांची उघड फसवणूक केली जात आहे कामगारांना माहीत नसते की आपणाला कामावर दाखवून बँकांच्या कोऱ्या सलीपवर सह्या व अंगठे घेऊन पैसे उचलत असतात
आसच एक प्रकार तपसे चिंचोली येतील लक्ष्मण कांबळे याना एस पी शोष खड्याच्या महादेव माळ रस्त्याच्या कामावर दाखवल्याचा प्रकार उघडकी आहे म्हणून पंचायत समितीला अर्जा द्वारे कळविले असतानाही कसलीच चौकशी न करता भ्रष्ट कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे शासनाकडे कामगाराने कामाची मागणी केल्या नंतर कामदेण्याची शासन हमी देते जर शासनाने कामगाराला काम नाही दिल्यास 90 दिवसाचा पगार दिला जातो असे असताना ही आमी कामावर दाखवलेच नाही म्हणत लक्ष्मण राम कांबळे ची फसवणूक केले आहे
लक्ष्मण कांबळे हा मुबईत एका खाजगीया सेक्युरिटी कंपनीत (व्हीनस लॉस प्रेवेंशन सर्विसेस) येथे कामाला असताना 17/5/2014 ही कामाला लागल्याची तारीख असून चर्चगेट मुंबई काम्पियन हायस्कूल येथे सुरक्षा रक्षक म्हणून जून 2014 व 1 ते 23 जुलै2014 पर्यंत कामावर असताना तपसे चिंचोली येथे रोजगारहमीचे कामावर 10/7/2014ते 16/7/2014 ते17/7/2014ते 23/7/2014 ते7/8/2014 ते 13/8/2014 या वरील तारखेला आर सी तपसे चिंचोली ते महादेव माळ रस्ता 0.00ते0.750 असे या कामावर दाखवण्यात आले आहे हा सर्व प्रकार लक्ष्मण कांबळे याचे नजरेस आला आहे तसेच एस पी शोष खड्याच्या कामावर पण दाखवण्यात आले आहे या सर्वं कामाची कसून चौकशी करण्यात यावी म्हणून पंचायत समितीच्या दिलेल्या अर्जात ग्रामपंचायत ला आलेल्या सर्व कामाची ही चौकशी करावी रोजगार हमीचे कार्ड बीडीओ साहेबांच्या हस्ते वाटप करण्यात यावे असे बी डी ओ पंचायत समिती औसा याना विनंती केली होती पण आद्याप पर्यंत जॉब कार्ड वाटप केलेली नाहीत म्हणून कामावर घोटाळा का करण्यात आला याची चौकशी व्हावी दोषींवर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे अर्जा द्वारे मागणी ग्रामस्थांनी व लक्ष्मण कांबळे यांनी मागणी केली आहे