देवनार एम ईस्ट वार्डात पुनर्वसन प्रकल्पात १२५१ कोटींचा घोटाळा
-वर्षा गायकवाड यांचा आरोप
मुंबई -महायुती सरकार मस्त, मुंबईकर मात्र त्रस्त या अभियाना अंतर्गत महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारची पोल खोल करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.पुढे बोलताना खा. वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, देवनार प्रकल्पात निविदा व आर्थिक अनियमितता आढळून आलेली आहे. हे संपूर्ण प्रकरण पाहता काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत जसे की, प्रत्यक्ष काम न करता ₹८६ कोटी का अदा करण्यात आले? ₹३५९ कोटींची खर्चवाढ नवीन टेंडरशिवाय का मंजूर केली? जे फ्लॅटचा भागच नाही अशा जागांसाठी (paver blocks, open space) पैसे का दिले? प्रकल्पाला “Turnkey” म्हणवूनही सतत व्याप्ती, खर्च, कालावधी का बदलत होते? सीव्हीसी CVC मार्गदर्शक असूनही ११०% बँक हमी का काढली? यासाठी बीएमसी BMC मधील कोण जबाबदार आहे? हितसंबंध असूनही Master & Associates सल्लागार का कायम आहेत? याची उत्तरे मिळाली पाहिजेत अशी मागणीही यावेळी केली.
महायुती सरकार मस्त, मुंबईकर मात्र त्रस्त या अभियाना अंतर्गत महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारची पोल खोल करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आजच्या पत्रकार परिषदेसाठी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, मा. नगरसेवक अश्रफ आझमी, मोहसीन हैदर, शीतल म्हात्रे, डॉ. अजंता यादव, बब्बू खान, अर्शद आझमी, टुलिप मिरांडा, अखिलेश यादव इत्यादी उपस्थित होते.
शेवटी बोलताना वर्षा गायकवाज म्हणाल्या की, देवनार प्रकल्पातील भ्रष्टाचार पाहता, ऑडीट व कायदेशीर चौकशी होईपर्यंत कोणतेही रक्कम दिली जाऊ नये. ८३ कोटी रुपयांसाठी ११० टक्के बँक हमीची अट पुन्हा लागू करावी, नवीन टेंडर काढावे. ठेकेदार AGSA Infra ला ब्लॅकलिस्टिंग करावे व या विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी केली.
Tags:
MUMBAI