Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ही यंत्रणा आहे, भांडणे करण्यासाठी नाही

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ही यंत्रणा आहे, भांडणे करण्यासाठी नाही
-मानसी मिना,मनपा आयुक्त 

टोइंग कर्मचाऱ्याची चारित्र्य आणि वर्तणूक तपासणार

ड्रेसकोड, आयकार्डची सक्ती : जिथे नो पार्किंग आहे, त्या ठिकाणी दंडाच्या रकमेचा फलक लावून जनजागृती


लातूर : नो पार्किंग झोनमध्ये चुकीच्या पद्धतीने दंड वसुलीवरून होणारे वाद आणि भांडणे टाळण्यासाठी लातूर महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता टोइंगच्या कामावर ठेवल्या जाणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची चर्तणूक आणि चारित्र्य तपासणी करण्यात येणार आहे. यापुढे, नवीन निविदा देताना संबंधित कर्मचाऱ्यांची वर्तणूक तपासणी केली जाईल. त्यानंतरच कंत्राट देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे निर्देश महापालिका आयुक्त मानसी मीना यांनी दिले आहेत.

नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करताना होणारे गैरसमज आणि भांडणे टाळण्यासाठी आयुक्त मानसी मीना यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आणि महानगरपालिकेतील अधिकारी उपस्थित होते. बैठकीतील प्रदीर्घ चर्चेनंतर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी काही नियम व अटी तयार करण्यात आल्या आहेत. त्यांच्या अधीन राहूनच नवीन एजन्सी काम करेल.

बैठकीतील मुद्दे; वर्तणूक, चारित्र्य पडताळणी अनिवार्य

टोइंगसाठी कंत्राटदारांकडून नेमल्या जाणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची चारित्र्य आणि वर्तणूक तपासणे आवश्यक असल्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

कायदेशीर दंड वसुलीवर भर

नो पार्किंगमधील वाहनांवर नियमानुसार दंड वसूल करांवा. मात्र, भांडण करून किंवा मारहाण करून दंड वसूल करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. दंड वसुली कायदेशीर मागनिच व्हावी, यावर बैठकीत चर्चा झाली.

नियमाबाबत जनजागृती....

१ ज्या एजन्सीकडे टोइंगचे काम येईल, त्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड, ओळखपत्र बंधनकारक असेल. नो पार्किंग क्षेत्रात दंडाच्या रकमेचा फलक लावणेही अनिवार्य असेल.

२ नवीन एजन्सीची नियुक्ती करण्यासाठी ई-टेंडरिंग केले जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी लागेल. मनपाने दिलेले नियम व अटी ज्यांना मान्य असेल, त्यांनाच काम मिळेल.

निवड झालेल्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे बंधनकारक असेल, ज्यामुळे त्यांना नागरिकांशी चांगला संवाद साधता येईल.

66

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ही यंत्रणा आहे, भांडणे करण्यासाठी नाही, यावर बैठकीत भर देण्यात आला. कारवाई करताना कोणताही तंटा होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यावर जोर दिला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक

लातूर: मनपात झालेल्या टोइंग उपाययोजनेबाबत आयुक्त मानसी मीना यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला अपर आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, प्रादेशिक परिवहनचे निरीक्षक संदीप मोरे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे, शहर अभियंता नवनाथ केंद्रे, मनपाच्या परिवहन विभागातील आशिष गाढवे, अतिक्रमण विभाग प्रमुख रवि कांबळे, वाहन विभागाचे प्रमुख पवन सुरवसे आदींची उपस्थिती होती. वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी बैठकीत दीर्घ चर्चा करण्यात आली.

अधिकाऱ्यांनी विविध उपाय सुचवले. या निर्णयामुळे टोइंग प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि नागरिकांना होणारा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा यामुळे व्यक्त होत आहे. नागरिकांशी व्यवहार करताना कशी शिस्त असायला हवी, याबाबत बैठकीत काही मुद्दे उपस्थित करण्यात आले. त्याअनुषंगाने नवीन एजन्सीची निवड ई-टेंडरिंग पद्धतीने होईल. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, ड्रेसकोड, आयकार्ड याबाबत ज्यांना मान्य होईल, त्यांनाच पार्किंग व्यवस्थेचे काम मिळेल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात
Previous Post Next Post