Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर जिल्ह्यामध्ये वाहतूक गुत्तेदाराकडून रेशनचा अपहार उघड़?;पोत्यामागे तिन ते चार किलो रेशन कमी,मनसेने केले स्टिंग ऑपरेशन

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर जिल्ह्यामध्ये वाहतूक गुत्तेदाराकडून रेशनचा अपहार उघड़?;पोत्यामागे तिन ते चार किलो रेशन कमी,मनसेने केले स्टिंग ऑपरेशन 




लातूर -लातूर जिल्हयामध्ये वाहतूक कंत्राटदार गोदामपाल राशनमध्ये अपहार करत असल्याबाबत मनसे चे निवेदन देवून कार्यवाही होत नसल्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते मात्र तहसीलदार आणि जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी 'मंथली'च्या लालसे पोटी कसलीही कार्यवाही करण्यात आली नाही.
बुधवार दि ६मार्च रोजी जळकोट मध्ये मनसे च्या कार्यकर्त्यांकडून राशन अपहार प्रकरणी स्टींग ॴॅपरेशन करून टेम्पो गाडी पकडली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या गाडी मध्ये तब्बल १०० कट्टे राशन अढळून आढळले आसून प्रत्येक पोत्यामधून तिन ते चार किलो राशन कमी असल्याचे समोर आले आहे.या चा पंचनामा जळकोट येथील गोदामपाल यांनी केला असून या पंचनाम्या मध्ये नियमानुसार गाडीला हिरवारंग लावलेला नाही तसेच वजन काटा ही अढळून आला नाही. धक्कादायक बाब म्हणजे राशन दुकानदारांना घरपोच मालाची सुविधा असताना मात्र दुकानदारांकडून पैसे घेण्यात येत असल्याचे अढळून आले आहे.पुढील कार्यवाही करण्यात येत असून लवकरच गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कशा प्रकारे करण्यात येतो वाहतूक गुत्तेदाराकडून रेशनचा अपहार?

मनसेने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले निवेदन
लातूर जिल्हयामध्ये वाहतूक कंत्राटदार गोदामपाल राशनमध्ये अपहार करत असल्याने आपण जिल्हाभरातील गोदामपाल व वाहतूक कंत्राटदारांनी पाहणी व चौकशी करुन त्यांच्यावर राशन अपहार प्रकरणी व नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कडक कार्यवाही करावी याबाबत दिनांक 23.01.2024 रोजी दिलेल्या निवेदनावर आपल्याकडून कसल्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याने दि ३ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले, त्यामध्ये लातूर जिल्हयातील तालूका गोदाम मधून वाटप होणाऱ्या धान्याचे वजन बारदान्याचे वजन सोडून निव्वळ धान्य 50 किलो चा कट्टा असायाला पाहिजे. परंतू त्यामध्ये प्रत्येक कट्टयात 2 ते 3 किलो धान्य कमी दिले जाते तसेच 2 ते 3 कट्टेही कमी दिले जातात. तसेच वाहतूकीच्या दूसऱ्या टप्यामधील वाटपावेळी दुकानदारास धान्य मोजून देणें हे वाहतूक कंत्राटदारास बंधनकारक असून देखील प्रत्येक वाहनामध्ये वजन काटयाची व्यवस्था नियमाप्रमाणे असायाला पाहिजे. परंतू वाहनात वजन काटा न ठेवल्यामुळे धान्य वजन न करताच राशन दुकानांमध्ये उत्तरविले जाते राशन दुकानदाराने वजन करुन धान्य मागविल्यास तालूका पूरवठा अधिकारी, गोदामपाल यांच्यामार्फत दबाव आणून असेल त्या वजनाचे धान्य राशन दूकानदारास उतरवून घ्यायला भाग पाडले जाते
नियमाप्रमाणे वाहतूक कंत्राटदाराने वाहतूकीस उपयोगात आणायाच्या वाहनांवर "लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरन व्यवस्था सुधारीत धान्य वितरन पध्दत महाराष्ट्र शासन " असे ठळक अक्षरात वाहनावर लिहणे असवश्यक असतानाही वाहतूक कंत्राटदाराच्या व नियंत्रणातील वाहनावर असे लिहलेले दिसून येत नाही. तसेच नियत्रंणाखालील वाहनांना (संपूर्ण वाहनास) हिरवा रंग देणे बंधनकारक असतानाही तो दिला जात नाही याचा फायदा घेवून कंत्राटदार, गोदामपाल, पुरवठा अधिकारी यांच्या संगनमताने गोदाममधील माल, गोदाममधील सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बंद करुन विना नोंदीत वाहनामध्ये अनाधिकृतरित्या राशन धान्य भरुन काळा बाजार करित आहेत. काही तालूक्यात वाहतूक व कंत्राटदाराने उपकंत्राटदार निवडले आहेत व ते धान्याचा काळा बाजार करत आहेत. औसा येथील शिवलिंग औटी हे व्यापारी तसेच निलंगा, कसार शिरसी, शिरुर अनंतपाळ येथील संजय निला यांच्यामार्फत एफ.सी.आय.च्या टेंडरच्या नावाखाली शासकीय धान्य गोदामातून राशनचा काळाबाजार करत आहेत. यासंदर्भात दि. 20/02/2024 रोजी संजय निला यांचा काळयाबाजारात विकीस जाणारा तांदूळाचा टेम्पो MH 14 AH 2698 विवेकानंद पोलीस स्टेशनला पकडण्यात आला होता व याप्रकरणात गुन्हाही दाखल झाला आहे. कंत्राटदाराने उपकंत्राटदार नेमून धान्याचा काळाबाजार सुरु ठेवला आहे ही बाब आम्ही आपल्या निदर्शनास आणून दिली होती पण काहीही कार्यवाही न झाल्याने संजय निला
यांना काळाबाजार करण्यास एक प्रकारे आपली मदत झाली आहे.
तसेच दुकानदारास धान्य मोजून देणे व दूकानात थप्पी लावून देण्याची जबाबदारी वाहतूक कंत्राटदाराची असते बाहनामध्ये वजन काटयाची व्यवस्था कंत्राटदारास करायची असते. परंतू असे होताना दिसत नाही वाहन कर, विमा प्रदूषण, वाहनासाठी बंधनकारक आहे तसेच चालक, मदतनीस, हमाल यांचा विमा उतरविणे कंत्राटदारास बांधील असते पण कंत्राटदार हा नियम पाळत नाही.
वाहनांना GPS यंत्रणा Geo mapping यंत्रणा Geo mapping सह बसवणे, लोड रोल यंत्रणा बसवणे, पुरवठा साखली यंत्रणेची अंमलबजावणी करणे हे वाहतुकदारास बंधनकारक असते परंतू अनेक वाहनांना GPS यंत्रणा बसवलेली दिसत नाही तर अनेक वाहनांची GPS यंत्रणा बंद पडलेली आहे. असे धान्याचा काळाबाजार करण्यासाठी केले जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालया कडून कंत्राटदार व नियंत्रणाखाली असणान्या वाहनाची यादी शासकीय गोदाम परिसरात दर्शनी फलकावर लिहावी त्यामुळे कोणते, वाहन अधिकृत आहे आणि कोणते वाहन अनाधिकृत आहे हे कळेल व यामुळे पारदर्शकता येईल. अनाधिकृत वाहन जर शासकीय गोदामात येत असेल तर गोदामात व वाहतूक कंत्राटदार यांच्यावर गुन्हा नोंद करावा.
या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपणास दिनांक 23/01/2024 रोजी निवेदन देण्यात आले होते परंतू, आपण वस्तूरिथीची कसलीही पडताळणी केली नाही व काहीच कार्यवाही पण केली नाही त्यामुळे आपणास निवेदन देवूनही धान्याचा काळाबाजार व नियमांचे उल्लघंन पूरवठा यंत्रणेकडून थांबलेले दिसत नाही त्यामुळे या सर्व बाबींचा मा. जिल्हाधिकारी मॅडम यांनी गांभीर्याने विचार करून वस्तुस्थितीची पडताळणी करुन दोषीवर कडक कार्यवाही करुन राशनचा होत असलेला अपहार रोकावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टींग ऑपरेशन करुन मनसे स्टाईल दोषीवर कार्यवाही करेल अशा प्रकारे निवेदन देण्यात आले होते.


Previous Post Next Post