समाज कल्याण विभागाचा होत आहे आश्रम शाळा शिक्षकांवर अन्याय
सलग दोन -दोन तीन- तीन महिने वेतन होत नसल्याने आश्रमशाळा शिक्षक आर्थिक पेचात अडकला आहे . हा प्रश्न एका वेळचा राहिला नसून 2018 ते 2021 पर्यंत समाज कल्याण आयुक्त पुणे, प्रादेशिक उपायुक्त लातूर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त उस्मानाबाद, जिल्हाधिकारी, विद्यमान आमदार ,खासदार, शिक्षक आमदार यांना सातत्याने निवेदने देऊनही यावरती कसलाही तोडगा निघालेला नाही. आश्रमशाळा शिक्षकांचे वेतन संदर्भात संबंधितांना विचारणा करण्यात आली असता ठोकताळा पद्धतीने एकच उत्तर मिळते बजेट आले नाही. परंतु या एका वाक्यामुळे सर्व प्रश्न मिटत नाही .शिक्षक कर्मचाऱ्यांनी घेतलेली गृहकर्जे व इतर कर्जे यांना वेळेत हप्ते न गेल्यामुळे बँकाकडून व्याजावर व्याज लागत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.