Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर जिल्हा परिषद मध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार..! मुख्य कार्यकारी अधिकारी ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत गिरी, रेनापुर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मोहन अभंगे ,काकासाहेब जाधव यांना निलंबित करण्याची मुख्यमंत्र्यांना केली मागणी..!

 लातूर जिल्हा परिषद मध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार..!

मुख्य कार्यकारी अधिकारी  ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत गिरी, रेनापुर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मोहन अभंगे ,काकासाहेब जाधव यांना निलंबित  करण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी..!




लातूर प्रतिनिधी:-

 लातूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी  ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत गिरी, रेनापुर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मोहन अभंगे ,काकासाहेब जाधव यांना निलंबित  

करून त्यांच्या १जानेवारी २०१५ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत केलेले कामाची   SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी कामगार विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल जमादार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण, संस्कृती कार्य तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या कडे लातूरचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे.


        निवेदनात असे म्हटले आहे की , लातूर जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात आलेल्या 

महात्मा गांधी रोजगार हमी योजना विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला बालकल्याण विभाग, बांधकाम विभाग ,पाणी पुरवठा विभाग, पशुसंवर्धन विभाग ,शिक्षण विभाग, रमाई घरकुल आवास योजना ,व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतःचे दालन तयार करण्यासाठी २ कोटी रुपये  खर्च करण्यात आले आहेत ,इमारत रंगरंगोटी करण्यासाठी १ रुपये खर्च केले आहेत वइतर अनेक कामांमध्ये लाखो रुपये चा भ्रष्टाचार  केला आहे. बांधकाम विभागातील अनेक कामाचे टेंडर नियम बाहय देण्यात आलेली आहेत. पाणी पुरवठा विभागातील अनेक कामाचे इस्टिमेट गरजेपेक्षा जास्त दाखवून कंत्राटदाराकडून कमिशन खाण्याचे प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संमतीने झाली आहेत . लातूर जिल्ह्यात पाणीपुरवठा विभागा मार्फत अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत काही गावा मध्ये जुन्या योजना नवीन दाखवून लाखो रुपयांची शासनाची फसवणूक केलेले आहे .मनरेगा अंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीची कामे बोगस करण्यात आलेली आहेत .लाभार्थ्यांकडून प्रत्येकी दहा हजार रुपये घेण्यात येतात, रमाई योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपये ते दहा हजार रुपये घेण्यात येतात ,अनेक गावांमध्ये घरकुल न बांधता गटविकास अधिकारी यांनी लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत व लाभार्थ्यांनी घरी बांधलेली नाहीत काही लाभार्थ्याच्या नावावर 8अ नसताना त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आलेला आहे काही गावांमध्ये एका 8अ वर दोघांना लाभ देण्यात आलेला आहे  जिल्हा परिषद लातूर मध्ये अनुकंपा मधील लोकांकडून लाखो रुपये घेतल्याशिवाय त्यांना कामावर घेत नाहीत. बदलीसाठी मोठ्या प्रमाणात काळाबाजार केला जातो ग्रामसेवकाकडून वरिष्ठ अधिकारी हप्ते घेतात .जिल्हा परिषद लातूर येथील मनरेगा विभागातील, बांधकाम विभागातील, पाणी पुरवठा विभागातील, कार्यकारी अभियंता ,उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता ,कनिष्ठ अभियंता प्रत्येक कामात टक्केवारी घेतल्याशिवाय कामे करत नाहीत. बांधकाम विभागा मार्फत मंजूर रस्ते कामे न करता व बोगस कामे करून बिले उचललेली आहेत .दलित वस्ती योजनेअंतर्गत अनेक बोगस कामे करून बिले उचललेली आहेत .पंचायत विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी विस्तार अधिकारी, हे पैसे घेतल्याशिवाय कामे करत नाहीत ग्रामसेवकांना गट विकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना महिन्याला पैसे द्यावे लागतात. घेतल्याशिवाय कामे करत नाहीत . जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मध्ये प्रकल्प संचालक यांच्या संमतीने रमाई घरकुल योजनेमध्ये प्रत्येक तालुक्यात व तालुक्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत आहे रमाई घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरपंच व ग्रामसेवक पाच हजार रुपये घेतात व पंचायत समिती मधील  अधिकारी कर्मचारी यांना सुद्धा पैसे द्यावे लागतात.14 वा वित्त आयोग व 15 वा वित्त आयोग निधी अंतर्गत करण्यात आलेल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे चौकशी केल्याशिवाय बाहेर येणार नाहीत म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व रेणापूर पंचायत समितीमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार करण्यात आला असून भ्रष्टाचार गटविकास अधिकारी मोहन अभंगे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत गिरी यांच्या सहमतीने केला आहेत रेणापूर पंचायत समितीचे गट वकास अधिकारी हे कुठलेही काम करण्यासाठी 5 ते 10 टक्क्याची मागणी करतात, टक्केवारी नाही दिली की कामे अडवतात. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व रेणापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मोहन अभंगे यांच्या भ्रष्टाचारा संबंधित अनेक तक्रारी ई-मेल द्वारे आपल्या कार्यालयाकडे व जिल्हाधिकारी लातूर यांच्या मार्फत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी लातूर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाखल केलेल्या आहेत व त्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयामार्फत अनेक पत्र जिल्हा परिषद ला येऊन सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांनी कुठलीही कार्यवाही केलेली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी दालनांमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत गिरी यांनी हे आपल्या दालनामध्ये सुनावणी ठेवतात, तक्रारदारांचे म्हणणे ऐकून न घेता व त्यांना धमकावून तुमच्यावर 353 चा गुन्हा दाखल करतो असे म्हणून अपमानाची वागणूक देवून विषय निकाली काढतात. आजपर्यंत गेल्या पाच वर्षात अनेक प्रकरणे पुराव्यानिशी अधिकारी दोषी आढळले असतांना सुध्दा त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. यावरून असे सिद्ध होते की मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत गिरी यांचे जिल्हा परिषद लातूर अंतर्गत जिल्ह्यांमधील भ्रष्टाचाराला संपूर्ण समर्थन आहे लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत गिरी, रेणापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मोहन अभंगे काकासाहेब जाधव यांना निलंबित करून यांच्या कार्यकाळातील यांच्या सहीने मंजूर केलेल्या सर्व कामाची एसआयटी मार्फत तात्काळ चौकशी करण्यात यावी. अन्यथा आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशी मागणी  कामगार विकास संघटना संस्थापक अध्यक्ष अमोल जमादार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



कामगार विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल जमादार

"लातूरचे पालकमंत्री  कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री , अर्थमंत्री, इतर विभागाचे मंत्री यांच्याशी  भांडून लातूर जिल्ह्यासाठी निधी आणतात लातूर जिल्हा परिषदेतील अधिकारी पदाधिकारी हे संगनमताने भ्रष्टाचार करून निधी हडप करतात याकडे लातूरची पालकमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असे मत कामगार विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल जमादार यांनी  व्यक्त केले."



Post a Comment

New comments are not allowed.*

Previous Post Next Post