Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

गुन्हेगारीचा पर्दाफाश….! शहरातील एका क्लासेसमध्ये विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याबद्दल क्लास चालकावर गुन्हा दाखल..! आरोपी फरार..

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
शहरातील एका क्लासेसमध्ये विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याबद्दल क्लास चालकावर गुन्हा दाखल..!
आरोपी फरार..
 
लातूर मध्ये शिक्षण घेण्यासाठी मागील काही वर्षापासून मुलामुलींचे येण्याचे प्रमाण वाढले असून शिक्षण पॅटर्न म्हणून लातूर ची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाल्यामुळे त्यांची संख्या हजारोंच्या घरात वाढली आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी शहरातील मामाडगे क्लासेस चे आठवी,नववी ,दहावी सायन्स शिक्षक शिकवणारे मामाडगे यांनी मुलीशी गैरवर्तन   केल्याची बातमी लातूर शहरांमध्ये वार्‍यासारखी पसरली..! यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवून सोशल मीडियावर याबाबतची माहिती वायरल केली. पिडीत कुटुंबातील सदस्यांनी रविवारी सायंकाळी त्या ट्यूशन चालकाला झोप दिला त्यामुळे एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज गायब केल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित कुटुंबीयांना न्याय  मिळवून देण्यासाठी मनसे सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. बरेच ट्युशन  क्लास चालवणारे हा विषय वाढू नये म्हणून प्रयत्न करत होते, घटनेच्या दिवशी पासून आपले क्लास बंद ठेवल्यात असल्याचेही समोर आले. ही घटना म्हणजे लातूरच्या शिक्षक पेशीला काळीमा फासणारी असून आता आशा क्लास चालकांचे पोलीस व्हेरिफिकेशन करणे गरजेचे बनले आहे. उठ सुठ कोणीही क्लास चालू करुन, लाखोंच्या जाहिराती करुन विद्यार्थ्यांना  आकर्षित करत आहेत. लाखो रुपयांचे पॅकेज देऊन महाराष्ट्राबाहेरील बिहारी ,गुजराती तसेच गुंड व्यसनाधीन शिक्षक आणले जात आहेत,एक प्रकारे क्लासेस च्या नावावर विद्यार्थी बनवणारी फॅक्टरी चालू असल्याचे समोर येत आहे,पालकांनीही आता जागृत होणे अवश्यक बनले आहे.अशा घटना वारंवार होवूनये व त्यावर अंकुश यावा या साठी अशा क्लास च्या सर्व शिक्षकांचे वेळेस पोलीस व्हेरिफिकेशन होणे गरजेचे बनले आहे. यापूर्वी अशा घटना क्लासेस मध्ये घडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.परंतू जिवाची आणि मुलींच्या इज्जतिची भीती पोटी मुली पुढे येत नाहीत. त्यामुळे अशा नराधमाचे मनोबल दिवसेंदिवस वाढत चालले आहे .


आरोपी किशोर मामडगे या शिक्षकाने पिडित मुलीला  ऑफिस मध्ये बोलून तू मास्क का घालत नाहीस, बिना मास्क ची चांगली दिसतेस, दररोज माझ्या क्लासमध्ये बिना मास्कची घालून बसत जा, मी तुला आवडत नाही का ?असे म्हणून ऑफिस चा दरवाजा लावण्यास सांगितले तसेच यापुढेही गालाला वाईट हेतूने हात  लावला असल्याचे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले असल्याचे सागीतले आहे.पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी वेळीच या प्रकाराकडे लक्ष घातल्याने  बुधवारी रात्री शिवाजीनगर पोलीस स्टेशने मध्ये त्या नराधमावर 354(1)(4)भादवी ,पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे सांगीतले आहे.आरोपी फरार असुन लवकरच पकडणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले आहे.
पुढील तपास शिवाजी नगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक दिलिप डोलारे,तपासिक अमलदार देशमुख मेडम, शिवाजी नगर डिबी टिमpsi काजी,चामे काका साहेब बोचरे,गीरी हे करत आहेत


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post