लातूर जिल्हा परिषद येथील पंचायत विभागातील सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत
यांचे कार्यालय सापडेना...!
नागरिकांची होतेय हेळसांड..!
कृषी विभागात बसुन करतायत कारभार..!
लातूर प्रतिनिधी:- लातूर जिल्हा परिषद मधील पंचायत विभागातील सहाय्यक गट विकास अधिकारी
श्री व्ही. के. मुंडे यांच्यासाठी पंचायत विभागात ऑफिस आसणे आवश्यक होते. त्यासाठी पंचायत विभागातील देखभाल दुरुस्तीमध्ये त्यांचे नाव समाविष्ठ होते, व निधीची ही तरतुद करण्यात आली होती . तरीही सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत विभाग
श्री व्ही. के. मुंडे
यांना पंचायत विभागात न बसवता कृषि विभाग जि.प.लातूर विभागात बसविण्यात आल्यामुळे
कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुसऱ्या ठिकाणी बसावे लागत आहे याचा त्रास नाहक नागरिकांना सहन करावा लागत आहे .
गेल्या दोन वर्षांपासून जगावर कोरोना महामारी चे संकट असताना संपूर्ण देशात व महाराष्ट्र सरकार अडचणीत असताना लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेची संपूर्ण इमारत एक असताना स्वतःच्या दालनावर व पंचायत विभागाचे दुरुस्ती करण्याकरिता लाखों रुपयांची उधळण का केली आहे व त्यामध्ये सुद्धा कामाचे तुकडे करून निवीदा काढण्यात आल्या
मुख्य कार्यकारी अधिकारी ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांनी स्वतःसाठी आलिशान असे दालन तयार करून घेतले असून जिल्हा परिषदेतील इतर अधिकाऱ्यांना मात्र आहे त्या ठिकाणी आहे त्या अवस्थेमध्ये बसावे लागत आहे .जिल्हा परिषद लातूर येथील इतर अधिकारी सुद्धा हे शासनाचे कर्मचारी आहेत असे असून सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दालनावर लाखों रुपये खर्च केले असून या खर्चामध्ये सहाय्यक गट विकास अधिकारी यांचे कार्यालय का बनवले नाही..? त्यांना दुसऱ्या कार्यालय मध्ये का बसवण्यात आले ..?त्यांचे कार्यालय बनवण्यासाठी पैसे कुठे गेले? का कोणी खर्च करण्यात येणारे पैसे हडप केले का? असे जिल्हा परिषदेच्या आवारात व नागरिकांन मध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे. व त्यांना दुसऱ्या विभागात बसवणे हा त्यांचा अपमान असल्याचेही बोलले जात आहे.
जिल्हा कृषि अधिकारी (सा) हे रिक्त असलेले पद शासनाने भरल्यामुळे कृषि विभागात बसत असलेले सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत यांना इतर बसविण्यासाठी सांगण्यात आले. अति मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांना ठिक आहे काही दिवस थांबा असे सांगितले होते. परंतू काही झाले नाही कृषि विभागातील अधिकारी यांनी पुन्हा यांना विनंती केली असता सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत यांना बसण्यासाठी इतर ठिकाणी बसण्यासाठी जागा देतो म्हणाले पण . त्यांचे कारले अजूनही हलवण्यात आलेली नाही. कृषी विभागीत अधिकारी व कर्मचारी यांना बसण्यास खुप अडचणी होत आहेत. तसेच
पंचायत विभागाचे अधिका-यांसाठी कार्यालयाचे नुतनिकरण करण्यात आलेले आहे. मात्र इतर विभागातील कर्मचा-यांना मात्र बसण्यास अडचणीला सामोरे जावे लागत आहे. याकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते . जिल्हा परिषद मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत विभागाचे दुरुस्ती व नूतनीकरण का ? त्यांच्या दालनासाठी लाखों रुपयांचा खर्च कशासाठी करण्यात आला व इतर अधिकाऱ्यांना आहे त्या अवस्थेमध्ये का बसावे ,त्यांनाही दालनाचे नूतनीकरण करून द्यावे व सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत यांना कृषी विभागातून काढून पंचायत विभागात कार्यालय करून द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
कृषी विभागातील अधिकाऱ्यांना तेथील दालन उपलब्ध करावे असे दबक्या आवाजात नागरिकांमध्ये व शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये बोलले जात आहे.