क्रिडा संकुल मधिल अवैध अंडेवाला,रसवाला,मटकीवाला,पाणीपुरीवाला यांच्याकडून वसुली..!
गाळेच नाही..तर भाडे कशाचे...?
लातूर-जिल्हाक्रिडा संकुल मधिल गेट च्या बाहेर बसलेल्या अवैध अंडेवाला, रसवाला, मटकीवाला,चिवडेवाला आणि असे बरेच फेरिवाल्यांकडून गाळे भाड्याच्या नावावर 150ते500रूपयांपर्यंत जबरण वसुली करण्यात येत आहे, विशेष म्हणजे गाळे भाङयाच्या नावावर, जिल्हा क्रिडा कार्यकारी समीती या नावाने पावतीही देण्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
लातूर जिल्हाक्रिडा संकुल सध्या भाड्यावर चालत असुन मोठमोठ्या प्रोजेक्ट मधुन त्यांना करोड़ों रुपयाचे भाडे येत असुन सुध्दा जे फेरिवाले हाकलून दिले तर जातातही अशांकडून त्यांना बसण्यासाठी सांगुन त्यांच्याकडुन पैसे कोणत्या नियमाखाली वसुल करण्यात येत आहेत आणि नेमके ते कोणाच्या खिशात जात आहेत. गाळेच नाही..तर भाडे कशाचे..? ते मात्र समाजण्यापलिकडे आहे.या फेरिवाल्यांचा क्रिडा संकुल मध्ये येणार्या सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असुन सोबत लहान लहान मुले खेण्यासाठी येत असुन ते हे रोडवरील खराब तेलापासुन बनवलेले पदार्थ खाण्यासाठी आग्रह करतात त्यामळे नाहक मुलांच्या तब्बेती बिघडत असल्याचे तेथील नागरिकांकडून सागीतले जात आहे.या जिल्हा क्रिडा समिति वर नेमके कोण लोक आहेत,याबाबत त्यांना माहिती आहे का?असा प्रश्न आता उपस्थीत होत आहे.यावर जिल्हाक्रिडा अधिकारी यांनी वेळीच लक्ष घालावे असे मत सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.