पॉस मशीन वर अनाधिकृत नॉमिनी केल्याप्रकरणी रास्त भाव दुकानदारावर लाचलुचपत विभागा तर्फे कारवाई करण्याची मागणी
दि.११/१०/२०२१ रोजी कार्यकर्ता मंच महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष रामेश्वर बाबुराव सूर्यवंशी यांनी माननीय लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्याकडे रास्त भाव दुकान क्रमांक 34 दुकानदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत अर्ज केला होता.तक्रारी अर्जामध्ये अनाधिकृत (POS) नॉमिनी मारून भ्रष्टाचाराचा अमाप पैसा साठवला आहे आपल्या कार्यालयांतर्गत केलेल्या सापळा कारवाई मधील लाभ घेण्यासाठी रंगेहात पडलेले आरोपी आणि सदर दुकानदार दुकान क्रमांक 34 यांच्या (POS) मशीनचे अनधिकृत नॉमिनी धारक आहेत.माननीय साहेबांनी याबाबत चल आणि अचल मालमत्तेची संपुर्ण व उच्चस्तरीय चौकशी करावी आणि तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच अनाधिकृत नॉमिनी द्वारे भ्रष्टाचार केलेला पैसा, धान्य वस्तू याची जप्ती करण्यात यावी यासाठी अर्ज केला होता त्या अनुषंगाने लाचलुचपत विभाग, लातूर यांच्या कडून लवकरच कार्यवाही करण्यात येणार अल्याची माहिती समोर येत आहे.