Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर पोलिसाकडून दिवाळी निमित्त "नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या" शहीद पोलिसांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या.


 लातूर पोलिसाकडून दिवाळी निमित्त "नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या" शहीद पोलिसांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या.


               या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये दिवाळी सणानिमित्त पोलीस मुख्यालय येथील पोलीस निरीक्षक श्री. गफार शेख व त्यांची टीम यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जांबिया गट्टा तालुका एटापल्ली येथे ड्युटीवर असताना सन 2010 मध्ये नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अमलदार बालाजी विठ्ठल भोसले, राहणार गोंद्री तालुका औसा हमु मोती नगर, लातूर यांचे घरी जाऊन शहीद बालाजी भोसले यांचे कुटुंबीयांची आपुलकीने विचारपूस करून त्यांना मिठाई  देऊन शुभेच्छा दिले.




              शहीद बालाजी भोसले  हे माजी सैनिक होते. त्यांनी भारतीय सैन्य दलात बॉम्बे इंजीनियरिंग येथे नाईक पदावर 18 वर्ष देशाची सेवा करून निवृत्त झाल्यानंतर 2004 मध्ये गडचिरोली पोलीस दलात भरती झाले होते. प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची गडचिरोली मधील एटापल्ली तालुक्यातील जांबियागट्टा या नक्षलग्रस्त भागात पोस्टिंग झाली होती. त्यादरम्यान त्यांनी अनेक नक्षलवादी कारवाया हाणून पाडल्या होत्या. शहीद बालाजी भोसले हे भारतीय सैन्यामध्ये असताना बॉम्बे इंजिनिअरिंग येथे कार्यरत होते. त्यांना भूसुरुंग/ विस्फोटकाचे भरपूर ज्ञान होते. नक्षलवाद्यांनी पोलिसांना लक्ष करण्यासाठी पेरलेले अनेक ठिकाणचे भूसुरुंग शोधून काढून ते निकामी केले होते.त्यामुळे नक्षली कारवायांना खिळ बसली होती.त्यामुळेच शहीद बालाजी भोसले नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर होते.



           27 मे 2010 रोजी घात लावून नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात बालाजी भोसले शहीद झाले होते.लातूर पोलिसांनी शहीदाचे घरी जाऊन शहिदाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आपुलकीने विचारपूस केल्याने शहिदांचे कुटुंबीय भारावून गेले होते.



Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post