Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी टोल "फ्री "करण्यासाठी श्री नितिन गडकरी यांना लातूर येथे दिले निवेदन

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा लातूर जिल्हा च्या वतीने

 महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी टोल "फ्री "करण्यासाठी श्री नितिन गडकरी यांना लातूर येथे दिले निवेदन     


    
                      लातूर -  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा लातूर जिल्हा च्या वतीने श्री नितींनजी गडकरी  केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना महाराष्ट्रातील  सर्व पत्रकारांना टोल फ्री करावे असे निवेदन दिले.







नितींनजी गडकरी  हे लातूर मध्ये विविध कामाच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यासाठी आले होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांच्या घरी सदिच्छा भेट दिली असता नितींनजी गडकरी  यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल फ्री करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून वार्तांकनाचे अहोरात्र काम करीत आहे. एवढेच नाही तर रात्री, बेरात्री वार्तांकनासाठी सातत्याने प्रवास करावा लागत आहे म्हणून पत्रकारांना टोल फ्री केल्यास वार्तांकन करण्याची गती अधिक वाढणार असल्याने नितीनजी गडकरी यांनी पत्रकारांना टोल फ्री करून व तसे आदेशीत करावे.


यावर निश्चितच विचार केला जाईल असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले.


श्री.अंबेगावे डि टि.-
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष

"महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल फ्री करण्यात येण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी श्री नितिन गडकरी यांना स्मरणपत्र देण्यात यावे जेणे करुन ते लवकरात लवकर आमलात येईल असे आवाहन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष श्री अंबेगावे डि टि.यांनी केले आहे." 

या निवेदनावर लातूर जिल्हा अध्यक्ष लहूकुमार शिंदे, राज्य उपाध्यक्ष व्यंकट पन्हाळे, राज्य उपाध्यक्ष अजय सूर्यवंशी, राज्य महिला अध्यक्ष सुधाताई कांबळे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर,  संपर्क प्रमुख नितीन भाले,  संघटक संजय राजूळे, महिला अध्यक्षा वैशाली पाटील तसेच जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संतोष सोनवणे, युवक अध्यक्ष सुनील कांबळे, रवी बिजलवाड इत्यादींच्या सह्या आहेत.


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post