मानव जात वाचवायची असेल तर "बांबू" लावा
मी बांबू.... नाही ,तर .....लावतो!
-पाशा पटेल
मानव जात वाचवायचे असेल तर कठोर निर्णय घेऊन देशात दगडी कोळशावर चालणारे तर पेट्रोल-डिझेल तातडीने बंद करावे करावे लागणार आहेत तर सर्व वाहने इथेनालवर चालवावे लागतील परिणामी देशातील थर्मल चा कोळसा ऐवजी बांबूवर सुरु ठेवायची असतील तर बांबूची लागवड करण्याची गरज आहे असे मत देशातील पहिली खाजगी सार्वजनिक भागीदारीतून निर्मिती फिनिक्स आयशर वाहन चालक प्रशिक्षण संशोधन संस्था लोदगा औसा येथे सतरा कोटी रुपयाच्या केंद्रीय अर्थसहाय्यातून श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 25 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता होणार असल्याबद्दल घेण्यात येणाऱ्या पत्रकार
परिषदेमध्ये बोलताना पाशा पटेल यांनी सांगितले.
देशातील पहिली खाजगी सार्वजनिक भागीदारीतून निर्मिती फिनिक्स आयशर वाहन चालक प्रशिक्षण संशोधन संस्था लोदगा औसा येथे सतरा कोटी रुपयाच्या केंद्रीय अर्थसहाय्यातून नितीन गडकरी यांच्या हस्ते 25 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता होणार आहे परिषदेमध्ये एका पत्रकाराने अर्थसहाय्या बद्दल विचारले असता 17कोटी रूपये मंजूर असल्याचे त्यांनी सांगितले. आणि बांबू संदर्भात सविस्तर माहिती दिली. तसेच जगभरातील 198 देश आणि 1000 शास्त्रज्ञांच्या संशोधनातून तयार झालेल्या चार हजार पानांच्या या अहवालानुसार मुंबई कोलकत्ता यासह इतर शहरे पाण्याखाली जाणार असल्याची माहिती दिली ,यातून मानवी जातच धोक्यात आली आहे .ती वाचवायची असेल तर बांबू लागवड ही काळाची गरज असल्याचे त्यांनी बोलताना सांगीतले.
मी "बांबू"..... , नाही तर ....लावतो! असे म्हटल्यावर 17कोटी ला "बांबू" लागला म्हणून एकच पत्रकारांमध्ये हशा पिकला..!