लातूरच्या तरूण उद्योजकाचे मुंबई येथे निधन; संपूर्ण उद्योग जगतात हळहळ
भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐💐💐भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐💐💐💐
लातूर मध्ये संगम नर्सरी या नावाने प्रसिद्ध असलेले त्यांचे मालक तरुण उद्योजक श्री संगमेश्वर बोमणे यांचे रविवार दिनांक 6 जून रोजी मुंबई येथे निधन झाल्याची धक्कादायक बातमी मिळाली. या धक्कादायक बातमीमुळे लातूरच्या उद्योग जगतात हळहळ व्यक्त होत आहे थोड्याच कालावधीमध्ये त्यांनी आपला उद्योग उंच शिखरावर नेला ,त्याचा सार्थ अभिमान संपूर्ण उद्योगजगताला आहे. ते आज आपल्यापासून दूर गेल्याने लातूरमधील उद्योगजगताला धक्का बसला आहे,हि पोकळी भरून निघणे अवघड असल्याचे उद्योग जगतामध्ये बोलले जात आहे.त्यांच्या पश्चात पत्नी व मुले असा परिवार आहे .

