Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

अनधिकृतपणे वृक्षतोड केल्याबद्दल १ लाख रुपयांचा दंड महानगरपालिकेची धडक कारवाई पालिकेच्या कंत्राटी कामगारालाही दंड

 अनधिकृतपणे वृक्षतोड केल्याबद्दल १ लाख रुपयांचा दंड

 

महानगरपालिकेची धडक कारवाई

 

पालिकेच्या कंत्राटी कामगारालाही दंड



 

लातूर/प्रतिनिधी:कायद्याने झाडे तोडण्यास मनाई असताना परवानगी न घेता अनधिकृतपणे घरातील २ झाडे तोडल्याबद्दल महानगरपालिकेच्या वतीने संबंधित नागरिकाला १ लाख रुपयांचा दंड करण्यात आला. क्षेत्रीय कार्यालय क्र. बी मार्फत ही धडक कारवाई केली.झाडे तोडण्यास मदत करणाऱ्या पालिकेच्या उद्यान विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यालाही १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

 शहरातील शिवाजीनगर भागात मुंदडा स्टील वर्क्सच्या समोर सौ.पुष्पा ओमप्रकाश सोमाणी यांचे निवासस्थान आहे.या घरात बदामाची ३० फूट उंचीची व २३ इंच व्यास असणारी २ झाडे होती. अंदाजे १० वर्षांपूर्वी लावलेली ही झाडे असावीत. सोमाणी यांनी कसलीही परवानगी न घेता गुरुवारी (दि.१० जुन )ही दोन्ही झाडे तोडून टाकली.याची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय क्र. बी ने तेथे धाव घेतली.घटनेची प्रत्यक्ष पाहणी केली असता दोन्ही झाडे पुर्णपणे तोडून टाकल्याचे निदर्शनास आले.सोमाणी यांनी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ या कलमाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.नियमांचे उल्लंघन केल्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने प्रति झाड ५० हजार रुपये याप्रमाणे २ झाडांसाठी सोमाणी यांना १ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. संबंधितांकडून रक्कम वसूल करण्यात आली.ही झाडे तोडण्यासाठी मनपाच्या उद्यान विभागातील कंत्राटी कर्मचारी शब्बीर बासू शेख याने सोमाणी यांना मदत केल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे त्यानाही १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.पालिका आयुक्त श्री.अमन मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक  क्षेत्रीय अधिकारी श्री.संजय कुलकर्णी यांनी हि कार्यवाही पार पाडली.

  झाडे लावणे व त्याचे जतन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.झाडांशिवाय मानवाला ऑक्सिजन मिळू शकत नाही.लातूर शहराला हरित व सुंदर करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे.नागरिकांनी स्वतः वृक्षारोपण करून यात सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.त्यामुळे नागरिकांनी वृक्षतोड करू नये. अत्यावश्यक परिस्थितीत झाड तोडणे गरजेचे असेल तर त्यासाठी महानगरपालिकेकडून रीतसर परवानगी घ्यावी.परवानगी न घेता वृक्षतोड केली तर दंड ठोठावण्यात येईल,असा इशारा महापालिका आयुक्त श्री.अमन मित्तल यांच्या वतीने देण्यात आला आहे.


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post