कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय सज्ज
लातूर दि.०५- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असून जेष्ठ नागरीक आणि दोन पेक्षा अधिक आजाराची गुंतागूंत असलेल्या (कोमॉर्बिड) रूग्णांना लसीकरण करण्यासाठी एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रूग्णालयातील यंत्रणा सज्ज झाली आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार लातूर येथील यशवंतराव चव्हाण ग्रामीण रूग्णालयात दि. ८ मार्च २०२१ सोमवार पासून ६० वर्षावरील सर्व जेष्ठ नागरीकांना त्याच बरोबर ह्रदयविकार, मधुमेह, कर्करोग, अ
कोरोना प्रतिबंधात्मक लस सर्व व्यक्तीसाठी प्रतिडोस २५० रूपये नाममात्र शुल्क स्वीकारून लस देण्यात येणार आहे. तेव्हा सर्व जेष्ठ नागरीक आणि दोन पेक्षा अधिक आजार असलेल्या रूग्णांनी या कोरोना लसीकरण मोहीमेत सहभाग नोंदवावा असे आवाहन एमआयटी मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. एन.पी.जमादार आणि शैक्षणिक व प्रशासकीय संचालक डॉ. सरिता मंत्री यांनी केले आहे.

