Home शेतातील ऊस कारखान्यास घालण्यासाठी व शिव रस्ता तयार करण्यासाठी शेतकऱ्याचे जिलाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषण byमुख्य- संपादक: विष्णू आष्टिकर •February 27, 2021 0 शेतातील ऊस कारखान्यास घालण्यासाठी व शिव रस्ता तयार करण्यासाठी शेतकऱ्याचे जिलाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषण लातूर - लातूर पिंपरी अंबा येथील विनायक देविदास भिसे यांच्या शेतातील ऊस कारखान्याला तात्काळ घालण्यासाठी व पारंपारिक शिव रस्ता खोदून टाकलेला तात्काळ तयार करण्यासाठी शेतकऱ्यांचे26फेब्रुवारी पासुन कुटुंबासहजिलाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषण सुरू केले आहे.लातूर तालुक्यातील पिंपरी आंबा येथील शेतकरी विनायक देविदास भिसे यांची जमीन गाधवड येथील 231 व 232 मध्ये 1.20 आहे. या शेतातील पारंपारिक असलेला शिव रस्ता पाणलोट क्षेत्रातून दुरुस्त करून देतोत म्हणून खोदून टाकला तो तसाच आहे.त्यांच्या शेतामध्ये ऊस उभा आहे .11.8.2020 रोजी रांजणी येथील कारखान्याची ऊसतोड आली असता शिव रस्ता खोदून टाकला आहे म्हणून ऊसतोड परत गेली. परंतु दुसऱ्या रस्त्याने जाण्यासाठी शेजारी आडवा आडवा व दमदाटी करत आहेत. उसाचे पाणी बंद असल्यामुळे ऊस वाळत आहे त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे .अनेक वेळा प्रशासनाला अर्ज ,निवेदने देऊनही प्रशासन योग्य न्याय देत नाही त्यामुळे शेतकरी व त्यांचे कुटुंबासह जिलाधिकारी कार्यालया समोर प्रांगणात आमरण उपोषण सुरू केले आहे. Facebook Twitter