पत्रकार दिना निमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य मुंबई संघाच्या वतीने
श्री रवींद्रनाथ टैगोर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी याना शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपन संपन्न.
लातूर :लातूर दि. दर्पण दिना निमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा लातूर च्या वतीने श्री रविंद्रनाथ टैगोर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पाखर सांगवी ता. लातूर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन वृक्षारोपन करण्यात आले. या कार्यक्रमास राज्य महिला अध्यक्षा सुधाताई कांबळे , राज्य उपाध्यक्ष अजय सूर्यवंशी, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, मराठवाड़ा अध्यक्ष विष्णु आष्टीकर, लातूर जिल्हा अध्यक्ष लहू शिंदे, महिला अध्यक्षा वैशाली पाटील, लातूर समन्वयक सुनील बरूरे, औसा तालुका कोषाध्यक्ष श्रीकांत चलवाड़ उपस्थीत होते. मुख्याध्यापक जाधव आय एस तसेच नारायणपुरकर , राठोड विकास, पाटे एम यू ,पठाण अय्याफ, सय्यद सर, मलवाड सर, चौधरी सर इत्यादि शिक्षकानी परिश्रम घेतले.




