लातूर शहराच्या वाहनांची कागदपत्रे तपासणीच्या वेळी फोटो घेत असलेल्या पत्रकारासोबत केली आरेरावी....
फोटो हि केले डिलीट
पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे या कडे लक्ष देणार का?
लातूर/प्रतिनिधि
लातूर पोलिसांच्यावतीने शहरातील वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे मात्र या कागदपत्राच्या नावाखाली पोलिसांनी वाहन चालका सोबत केल्याचे प्रकार गांधी चौक पोलिसाकडून केला जात आहे. याबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. लातूर पोलिसांच्यावतीने शहरातील वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी ही कारवाई अविरतपणे चालणारी आहे. शनिवार दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास गांधी चौक पोलिसांच्यावतीने येथील जुन्या पोस्ट ऑफिस कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस वाहनांची गर्दी होणाऱ्या ठिकाणी थांबून वाहनाच्या कागदपत्राची तपासणी केली जात होती. यावेळी पोलिसाकडून वाहन तपासणीच्या नावाखाली वाहनाच्या चावी काढून घेतल्या जात होत्या. वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी करणे एवढेच पोलिसाचा अधिकार असतानाही ही ते वाहनचालकांना दमदाटी करून कागदपत्राची मागणी करत त्यांच्या वाहनाचे चावी काढून घेऊन वाहने गांधी चौक पोलिस चौकीत नेऊन लावणे असे प्रकार केले जात होते. पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी करून त्यांना जागेवर दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा त्यांच्यासोबत अरेरावी करून त्यांच्या दुचाकीच्या चाव्या ताब्यात घेणे असा प्रकार केला जात होता. ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत किंवा ज्यांनी कागदपत्रे घरी ठेवले आहेत ते दाखवण्याची तयारी असतानाही असंख्य दुचाकी गांधी चौक पोलिसात लावण्याचा प्रकार केला जात होता. यावेळी पोलिसांची मात्र अशा नागरिकांना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जात होती. नागरिकही पोलीस आहेत आपल्यावर कारवाई करतील गुन्हा दाखल करतील या भीतीने त्यांची अरेरावी सहन करत होते. असाच प्रकार एका पत्रकाराच्या बाबतीत घडला. पोलिसाच्या वतीने या भागात काय कारवाई चालू आहे अशी विचारणा या पत्रकाराने पोलिसाकडे केली. यावर त्या पोलीसाने वाहनाची तपासणी चालू आहे असे दरडावत तुझ्याकडे कागदपत्रे आहेत का दाखव असे म्हणतात त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली. हा प्रकार अन्य एका पोलिसाला माहिती झाल्यावर त्याने चावी काढून घेतलेल्या पोलिसाला कोण आहे रे तो घाल त्याला पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा बघू असे म्हणत पत्रकाराची दुचाकी चावीसह ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांना नागरिकांच्या दुचाकीची चावी काढून घेण्याचा अधिकार नाही. परंतु पोलिसाकडून नागरिकांच्या दुचाकीची चावी काढून त्यांच्यावर अरेरावी करण्याचा प्रकार वारंवार केला जात आहे. पत्रकाराची दुचाकी पोलीस चौकीत घेऊन गेल्यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांनी पत्रकारांना एकेरी भाषा वापरत कोण रे तू, तुझे ओळख पत्र दाखव. तू माझी परवानगी न घेता व्हिडिओ शूटिंग का केलास या आरोपाखाली तुझ्यावर कारवाई करतो. तुला अगोदर मध्ये टाकतो. नंतर तुझे म्हणणे काय ते बघू. असे आरे रावीच्या व दर्डावण्याच्या स्वरूपात बजावले. यावर पत्रकारांनी त्याचे ओळखपत्र दाखवल्यावर हे ओळखपत्र बोगस आहे असे म्हटले यावर त्या पत्रकारांनी शासनाचे ओळखपत्र दाखविल्यावर तू अगोदर तुझ्या मोबाईल मधले व्हिडिओ डिलीट कर असे म्हणत मोबाईल हातातून हिसकावून घेतला. व स्वता मोबाईलच्या गॅलरीत जाऊन पोलिस कारवाई करत असलेले व्हिडीओ डिलीट केले. व नंतर पत्रकार असलास म्हणून काय झाले तू मला कारवाईची माहिती विचार मी तुला बाईट द्यायला तयार आहे. अशी एकेरीची भाषा वापरली. असाच प्रकार 31 डिसेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान छत्रपती चौकात पोलिसांच्या वतीने पत्रकारासोबत झाला होता. लातूर पोलिसाकडून तपासणीच्या नावाखाली नागरिकांना अरेरावी करण्याचा प्रकार वारंवार वाढत आहे. लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नव्याने रुजू झाले आहेत. त्या नवीन पोलिस अधीक्षकांना आपले काम दाखविण्यासाठी ते नागरिकांना अरेरावी व पोलीस कारवाई करत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. पत्रकारा सोबतच अरेरावी हुज्जत घालण्याचा प्रकार होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे किती हाल पोलिसाकडून केले जात असतील याचा विचार करणेही अशक्य आहे. यावर पोलीस अधीक्षकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नागरिकांसोबत सौजन्याने वागण्याची तंबी द्यावी. अशी मागणी पत्रकार व सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
