निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य संघटक पदी ज्ञानेश्वर औताडे यांची निवड
लातूर : येथील पर्यावरण चळवळीत कार्यरत असणारे सहशिक्षक ज्ञानेश्वर औताडे यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य संघटक पदी निवड झाली आहे. ज्ञानेश्वर औताडे यांच्या पर्यावरण व वृक्ष संवर्धन कार्याची दखल घेऊन मंडळाचे राज्य अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली आहे.
ज्ञानेश्वर औताडे यांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये विविध उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धन जाणीव निर्माण करून विध्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन कार्यात सहभागी करुन घेतले आहे. एक विद्यार्थी एक वृक्ष हा उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविला आहे. तसेच वृक्ष लागवड, ऊर्जा संवर्धन, व्यसनमुक्ती यासारख्या विषयावर विविध वृत्तपत्रांत लेखन करून त्यांनी वेळोवेळी जनजागृती केली आहे. याबरोबरच त्यांनी वैयक्तिक व सामुहिक पातळीवर पर्यावरण चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आहे. ज्ञानेश्वर औताडे हे शहरातील जिजामाता कन्या प्रशालेत सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
