अराईज इंटरनॅशनल स्कूलला सी.बी.एस.ई.ची मान्यता
लातूर दि.17/12/2020
जेएसपीएम,लातूर शिक्षणसंस्था संचलित पिंपरी चिंचवड,पुणे येथील अराईज इंटरनॅशनल स्कूल,इंद्रायनी नगर,भोसरी या शाळेस केंद्रिय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सी.बी.एस.ई) ची मान्यता मिळालेली आहे.
पुणे येेथील अराईज इंटरनॅशनल स्कूलची स्थापना 2019-20 मध्ये झाली. पालक व विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेवून भव्य-दिव्य अशी ईमारत अनुभवी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग अद्यावत क्लासरूम अद्ययावत प्रयोगशाळा विविध खेळाची सुविधा असणारे मैदान अशा चौफेर सुविधा देण्यात आलेल्या आहेत. अराईज इंटरनॅशनल स्कूलने दोन वर्षातच उत्तम शैक्षणिक दर्जा सांभाळत स्कुलची वाटचाल सुरू ठेवलेली आहे. याबरोबरच सी.बी.एस.ई.ची सलग्नता मिळविण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपूरावा केला. आणि दोन वर्षातच जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळ,लातूर संचलित पिंपरी चिंचवड,पुणे येथील अराईज इंटरनॅशनल स्कूल,इंद्रायनी नगर,भोसरी या शाळेस केंद्रिय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सी.बी.एस.ई) ची मान्यता मिळालेली आहे. अराईज इंटरनॅशनल स्कूलच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, संस्थेच्या सचिव तथा माजी जि.प.अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, संस्थेचे कार्यकारी संचालक अजितसिंह पाटील कव्हेकर, संस्थेचे उपकार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार आदींनी अराईज इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य जितेंद्र खैरनार यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या