Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

उर्जा मंत्रालय महाराष्ट्र राज्य सरकार चा १४ वा ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन चे पारितोषिक प्रदान लातूर जिल्ह्यातून विशेष तिघांची राज्य स्तरावर निवड

 र्जा मंत्रालय महाराष्ट्र राज्य सरकार चा १४ वा ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन चे पारितोषिक प्रदान 

लातूर जिल्ह्यातून विशेष तिघांची राज्य स्तरावर निवड      






लातूर : दि. २६ डिसेंबर महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण - ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र राज्य सरकार चा १४ वा ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन पुरस्कार  पोस्टाद्वारे करण्यात आले. विद्यमान  
 परिस्थितीत कोविद-१९ च्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी प्रमाणे या वर्षी १४ वा ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन पुरस्कार सोहळा आयोजित होऊ शकला नाही म्हणून सर्व पुरस्कार विजेत्यांना घरपोच मोमेंटो आणि सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. वैयक्तिक सेक्टर मध्ये  प्रथम पारितोषिक  महावितरण चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्रकुमार राठौर मुरड (हल्ली नाशिक) तर व्दितीय क्रमांक एनजीओ - ब्रह्माकुमारीस एजुकेशनल सोसायटी बी. के.  नंदा यांना तर तृतीय क्रमांकाचा पारितोषिक केदार खमितकर यांना वर्ष २०१८-२९ करिता निवड करण्यात आले. मा. डॉ नितीन काशिनाथ राऊत मंत्री- नवीन व अक्षय ऊर्जा  आणि मा. प्राजक्त प्रसादराव तनपुरे- राज्य मंत्री नवीन व अक्षय ऊर्जा, महाराष्ट्र शासन यांच्या सोबत महाऊर्जा चे  महासंचालक श्री. सुभाष एस् डुंबरे आयएएस यांच्या  स्वाक्षरी चे सन्मान पत्र - मोमेंटो विशेष पोस्टाद्वारे प्रदान करण्यात आले. राज्यस्तरीय निवडीबद्धल महाऊर्जा डीजीएम कार्यालय लातूर चे डी.व्ही.कुलकर्णी यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post