पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते*
आमदार अमृततुल्य चहा १११ व्या शाखेचा शुभारंभ
लातूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर आमदार अमृततुल्य चहा नामक १११ व्या शाखेचा शुभारंभ राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते बुधवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सायंकाळी करण्यात आला.
आमदार अमृततुल्य उपक्रम हा लातूरच्या वैभवात भर टाकणारा उपक्रम असून याच्या अधिकाधिक शाखा शहराप्रमाणे ग्रामीण भागात देखील सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
पुढे बोलताना ना. अमित विलासराव देशमुख म्हणाले की, कोरोना काळात नागरिकांचे मिळालेले सहकार्य, लातूर मनपा, जिल्हा व आरोग्य प्रशासनाचे काम आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेले सर्वतोपरी प्रयत्न यामुळे आज कोरोना रुग्णांची संख्या घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी अद्याप कोरोना पूर्णपणे संपलेला नसून लातूर मनपा, जिल्हा प्रशासन व राज्य सरकार कडून लसीकरण मोहीम राबविण्या साठीची सर्व तयारी केली असून नागरिकांनी लसीकरण सुरू होईपर्यंत आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गड्डीमे व जाधव यांच्या पुढाकारातून लातुरात सुरू करण्यात आलेल्या आमदार अमृततुल्य उपक्रमास ना. अमित विलासराव देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान आमदार अमृततुल्य उपक्रमास लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी ही यावेळी शुभेच्छा दिल्या.
यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, राजीव गड्डीमे, ज्ञानोबा गड्डीमे, अनंत पोटे, संजय गड्डीमे, सौरभ जाधव, संकल्प गड्डीमे, आशा गड्डीमे, इंदिराबाई गड्डीमे, ज्योती पोटे, गोविंद डूरे पाटील, डॉ.सतीश कानडे, मोहन सुरवसे, अविनाश बट्टेवार, अब्दुल्ला शेख यांच्यासह गड्डीमे,जाधव परिवारातील सदस्य, मित्रपरिवार उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजू गड्डीमे यांनी केले तर शेवटी प्रा. शहाजी चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.
___________

