Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

रुग्णसेवा सदन संदर्भात व्यापक बैठक

 रुग्णसेवा सदन संदर्भात व्यापक बैठक 




लातूर/प्रतिनिधी: विवेकानंद मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या विवेकानंद कॅन्सर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी उभारण्यात येत असलेल्या रुग्णसेवा सदन संदर्भात व्यापक बैठक बांधकाम स्थळी पार पडली. या बैठकीत निधी संकलनासंदर्भात चर्चा करून बांधकामाची माहितीही देण्यात आली.
  रुग्णसेवा सदनाचे प्रकल्प समन्वयक पद्मभूषण डॉ.
अशोकराव कुकडे काका,मुंबई येथील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलचे शैक्षणिक संचालक डॉ.कैलास शर्मा, प्रकल्प अध्यक्ष बी.बी. ठोंबरे आणि रुग्णसेवा सदन समितीचे सदस्य ॲड. मनोहरराव गोमारे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी बोलताना डॉ. कैलास शर्मा म्हणाले की,कोरोनामुळे यावर्षी निधी संकलनात अडचणी आल्या परंतु त्याची भरपाई पुढील वर्षभरात होऊन जाईल.हा प्रकल्प नाविन्यपूर्ण आहे. समाजातील विविध घटक मदतीसाठी पुढे येत आहेत. लोकसहभागातील प्रकल्प उत्तम पद्धतीने चालतात. लातूर शहरातील व्यापाऱ्यांनीही या प्रकल्पास मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
   यावेळी बोलताना कुकडे काका म्हणाले की, रुग्णसेवा सदन हे एक आधुनिक केंद्र आहे. भविष्यातही या प्रकल्पासाठी समाजाकडून निधी उपलब्ध होईल.खा. सुधाकरराव शृंगारे यांनी नुकतीच ११ लाख रुपयांची देणगी दिली आहे. परदेशातूनही मदत मिळत आहे. कुठल्याही परिस्थितीत रुग्णसेवा सदनचे बांधकाम थांबणार नाही, असे त्यांनी सांगितले.
   ॲड.मनोहरराव गोमारे म्हणाले की, प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च ९ कोटी रुपये असला तरी तो वाढू शकतो. लातूरकर मंडळी सकारात्मक विचार करून मदत देतील.जे लोक या प्रकल्पासाठी हातभार लावतील त्यांच्यासाठी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ही म्हण खऱ्या अर्थाने लागू राहील, असे त्यांनी सांगितले.
   प्रास्ताविक करताना अनिल अंधोरीकर यांनी रुग्णसेवा सदन उभारण्याची संकल्पना डॉ.कैलास शर्मा यांची असल्याचे सांगितले.प्रकल्प उभारणी मागची भूमिका त्यांनी विषद केली. अतुल ठोंबरे यांनी बांधकामाबाबत विस्तृत माहिती दिली. रुग्णसेवा सदनात १५८  रूग्ण व त्यांच्या प्रत्येकी एका नातेवाईकांची व्यवस्था केली जाणार असून प्रत्येक मजल्यावर ८ स्पेशल रूम,१२ साध्या रूम,४  डॉर्मेटरी, एक हॉल, किचन व डायनिंग हॉल असणार आहे. एकूण बांधकाम ८१ हजार चौरस फुटांचे असून इमारतीला ४जिने व २ लिफ्ट असणार आहेत. इमारत पर्यावरण पूरक असणार आहे. इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारून विजेच्या बाबतीत इमारत स्वयंपुर्ण केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  समितीचे सहसचिव शिवदास मिटकरी यांनी कार्यक्रमाचे संचलन केले.या बैठकीस माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, डॉ. गोपीकिशन भराडिया, विजयभाऊ राठी, नितीन शेटे, जितेश चापसी, मकरंद जाधव, सौ.कुमुदिनी भार्गव, डॉ. सोपानराव जटाळ,डॉ. ब्रिजमोहन झंवर आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post