मंञी असताना पेक्षा आजचा दिवस माझ्यासाठी सर्वात आनंदाचा...
दिव्यांग साहित्य वाटप कार्यक्रमात आमदार निलंगेकर यांचे भावनिक उदगार
निलंगा/प्रतिनिधी
जिल्ह्यातील ८ हजार ७९७ दिव्यांगाना आज निधीचे वाटप करताना जेवढा आनंद झाला आहे तेवढा आनंद मला मंञी म्हणून काम करताना देखील झाला नसल्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले
ते निलंगा येथील प.स.च्या प्रांगणात झालेल्या एडीआयपी अंतर्गत दिव्यांग जणांना साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर जि.प.अध्यक्ष राहूल केंदे उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे तहसिलदार गणेश जाधव सभापती राधाताई बिराजदार उपसभापती अंजली पाटील जि.प.सदस्या अरूणा बरमदे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते नगरध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे संजय दोरवे चेअरमन दगडू सोळुंके अजित माने शाहूराज पाटील अदी उपस्थित होते.
पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले की देशातील गोरखपूर नंतर देशात दुसरा तर राज्यात पहिला असा दिव्यांग जणांना सहाय्यक यंञे व उपकरणे हा वाटपाचा कार्यक्रम आहे. प्रत्येक दिव्यांगाच्या घरात जाऊन हे साहित्य वाटप करावे अशा सुचना त्यांनी जि.प.सदस्य व प.स.सदस्य यांना दिल्या तसेच हे माझ्या वडीलांचे स्वप्न होते की प्रत्येक दिव्यांगाचा सन्मान करणे ते आज काही प्रमाणात पूर्ण केल्याचे समाधान मला झाले आहे.समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याचे स्वर्गीय अट्टल बिहारी वाजपेई यांचे विचार होते तोच धागा पकडून आम्ही काम करत आहोत.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी दिव्यांगाच्या सर्वांगीन विकासासाठी त्याना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कार्य आहे.याचा मला अभिमान वाटतो.प्रत्येक दिव्यांगाचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे.त्यांचा अपमान होईल असे काम आपण करू नये अशी विनंती उपस्थित लोकांना त्यानी केली.दिव्यांगाना अपमानास्पद बोललो तर संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची तरतुद कायद्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी केली आहे.
यावेळी जि प अध्यक्ष राहुल केंद्रे व तहसिलदार गणेश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला हेअरन केअर च्या प्रतिमेचे पूजन केले.
चौकट....
भारत बंदवर बोलताना त्यानी मौन सोडत विरोधकावर सडकून टीका करत त्यानी शेतकऱ्यासमोर चुकीचे चिञ उभे करून शेतकऱ्यांना दिशाभूल करण्याचा हेतू राज्य शासनासह विरोधकाचा असून शेतकऱ्यांचे त्याना हितच जोपासायचे असेल तर बाजार समितीचे सदस्य शेतकऱ्यांना करावे व राज्यातील संपूर्ण बाजार समित्या शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या त्या निर्णयाचे मी स्वागत करतो असे खुले आवाहन राज्य शासनाला आमदार निलंगेकर यानी केले.
ऊस विक्रीचे मर्यादित झोन उठवून केंद्र शासनाने शेतकऱ्यांना जास्तीचा पैसा कसे मिळेल हाच हेतू डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेतला आहे.तसेच धान्य उत्पादन व विक्री बाजार समित्या मार्फत न करता देशातील खुल्या बाजारपेठेत विक्री करण्यासाठी घेतला आहे परंतु राज्य शासन शेतकऱ्यांना पुढे करून त्यांची दिशाभूल करत आहे.निव्वळ त्यांच्या ताब्यातील बाजार समित्या व कार्यकर्ते जगवण्यासाठी हा स्टंट असल्याचा त्यांनी सांगितले