प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबीर संपन्न
लातूर : लातूर जिल्ह्यातील देवणी खु. उपकेंद्र येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबीराचे नूकतेच आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये उपकेंद्र देवणी खु अंतर्गत एनसीडी स्क्रीनिंग करण्यात आली. त्यात 112 रुग्णांची बीपी, शुगर, कॅन्सर व इतर आजारांची तपासणी करण्यात आली. यावेळी तरुणांचा उत्साह अभूतपूर्व होता, यामध्ये सी एच ओ डॉक्टर संजय घोरपडे, नर्स गायकवाड एस.बी., नर्स ज्योती नारगवाडे, एमपीडब्ल्यू बावगे, अंगणवाडी कार्यकर्ती दैवशाला कांबळे, सरोजा गायकवाड, मदतनीस अं.हौशाबाई सारगे, अयोध्या सुर्यवंशी, आशा कार्यकर्ती शोभा रणदिवे, रंजेना रणदिवे, वच्छला रणदिवे, गटप्रर्वतक रेखा लांडगे यांच्या मदतीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देवणी तालुकाध्यक्ष पत्रकार लक्ष्मण रणदिवे व पदाधिकारी यानी विशेष परिश्रम घेतले. सदर शिबीरात एकशे बारा लोकांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबीरासाठी ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी भरत गिरी यांचे अमूल्य सहकार्य लाभले.