धक्कादायक...!
लातूरच्या स्वच्छतेसाठी भाजपायुमोची निदर्शने
स्वच्छता सर्वेक्षणात लातूर तळाला
मग ओला कचरा सुका कचर्याचे नाटक कशासाठी?
लातूर दि.28
केंद्र शासनामार्फत घेण्यात येणार्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2020 मध्ये लातूर शहर देशात 137 व्या व महाराष्ट्रात 33 व्या क्रमांकावर आलेले आहे. स्वच्छ आणि सुंदर लातूर अशी लातुर महानगरपालिकेच्या माध्यमातून जाहिरात करणार्या लातूकरांच्या नशिबी यंदा अस्वच्छतेचा ठपका बसलेला आहे. यामुळे लातूरकरांचे आरोग्य आता धोक्यात आलेले आहे. याबाबत महापौर व मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले असूनही दुर्लक्ष होत असल्याने लातूर शहर भाजपा युवा मोर्च्याच्यावतीने शहरातील स्क्रॅप मार्केट परिसरात भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्त्वाखाली लातूर मनपाच्या विरोधात निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला.
स्वच्छ आणि सुंदर लातूर करण्याची जाहीरात मनपाच्या घंटागाडीच्या माध्यमातून दररोज केली जाते. लातूर शहर हे महाराष्ट्रातील स्वच्छ सर्वेक्षणात यंदा सर्वात अस्वच्छ शहर म्हणून समोर आलेले आहे. 2020 च्या स्वच्छ सर्वेक्षणात सर्वात शेवटचा क्रमांक लातूर शहराने मिळविला. भारतीय जनता पार्टीची महापालिकेत सत्ता असताना स्वच्छ सर्वेक्षण 2017 मध्ये लातूरचा देशात 318 वा क्रमांक आलेला होता. सुधारणा करून स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये लातूरचा क्रमांक 125 ने वर आला व शहर स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये भारत देशामध्ये लातूरचा 38 वा क्रमांक आला व सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये लातूर शहराने भारतातून पहिला क्रमांक मिळवण्याचे काम 2019 मध्ये केले. आता तेच कॉन्ट्रॅक्टर आहेत, तेच प्रशासन आहे, परंतु सध्या सत्तांतर झालेलं आहे. मनपात सध्या काँग्रेसची सत्ता आहे. आणि स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये लातूर शहराने देशामध्ये 137 वा क्रमांक व महाराष्ट्रात 33 वा सर्वात शेवटचा क्रमांक मिळविला आहे. लातूर शहरामध्ये जागोजागी कचर्याचे ढीग साठलेले दिसून येत आहेत. आपण स्क्रॅप मार्केट रोड असेल किंवा फ्रुट मार्केट असेल, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या कमानी जवळचा परिसर असेल अशी अनेक ठिकाणे आहेत. अशा ठिकाणी आपल्याला कचर्यांचे साम्राज्य दिसून येते. महापालिका आपल्या घरातून कचरा वेगवेगळा करून घेत असेल परंतु ते एकत्रितपणे कुठेतरी नेहून टाकतात यामुळे दुर्गंधी सुटत आहे. मग कचर्याचे वर्गीकरण करण्याचे ढोंग कशासाठी, असा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत अनेक वेळा महापौर व मनपा आयुक्तांकडे मागणी करूनही स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागत नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी भाजपा युवा मोर्चा लातूर शहर जिल्हाच्यावतीने भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्त्वाखाली स्क्रॅप मार्केट परिसरात तीव्र निदर्शने करण्यात आली.यावेळी भारतीय जनता युवा मोर्च्याचे मंगेश बिरादार,अमोल गित्ते,गणेश गोजमगुंडे,सागर घोडके, संजय गिर, वैभव डोंगरे,गजेंद्र बोकन, निरज गोजमगुंडे, गणेश गवळी, वल्लभ वावरे, , महादेव पिटले,सचिन सुरवसे, नवनाथ ढेकरे,,शैलेश बिराजदार, ओम धरणे, संतोष तिवारी, करण हाके, व्यंकटेश हंगरगे, अॅड.प्रकाश काळे, पूनम पांचाळ, सुमन राठोड, अफ्रिन खान,प्रागती डोळसे, रणजित गवळी, सचिन यादव, अॅड.किशोर शिंदे, चैतन्य फिस्के, ईश्वर सातपुते,सिदाजी पवार, अभिजीत मुनाळे, पृथ्वीराज कुरे पाटील, अॅड.सचिन कांबळे, प्रतिक मस्के, अॅड.हरिकेष पांचाळ, प्रेम मोहिते, काका चौघुले,रविशंकर लवटे, संजय कदम, धनु आवस्कर, राजेश पवार,सिध्दाजी पवार,अशोक माने,ओम राठोड,बालाजी खमामे,गणेश सगर,विलास बनसोडे,समाधन घोगरे,कृण्णा लोढे,प्रतिक मोकाशे,वैभव पाटील,अनिकेत अनराय,महेश चैव्हाण,कैलास आबेगावे, दुर्गेश चव्हाण, भागवत तिगिले, प्रकाश काळे, रंजित गवळी, शैलेश बिराजदार, अजय कोटलवार, विलास बनसुडे, फैय्याज शेख, आकाश पिटले, सोमनाथ सुर्यवंशी,कैलास आबेगावे,अकाश पिटले,उमेश इरपे,ओम शिदे,
प्रथमेश सुरवसे, आदी पदाधिाकर्यांसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कचर्याची योग्य विल्हेवाट लावा
अन्यथा परिणाम भोगावे लागतील
लातूर महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छ व सुंदर लातूर अशी जाहीरात घंटा गाडीच्या माध्यमातून केली जाते. ओला कचरा अन् सुका कचर्याचे वर्गीकरण करून घंटागाडीतच टाका अशी जाहीरात केली जाते. परंतु प्रत्यक्षात कचरा टाकताना मात्र एकाच ठिकाणी कचरा टाकला जातो. त्याची विल्हेवाट वेळेत लावली जात नसल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे लातूरकरांचे आरोग्य धोक्यात आलेेले आहे. याकडे लातूर महानगरपालिका कचरा व्यवस्थापनाचे सोंग कशासाठी करीत आहे. असा जाब विचारून मनपा याबाबत योग्य निर्णय घेत नसेल तर भविष्यात शहरातील कचर्यासाठी तीव्र आंदोलन उभारावे लागेल. असा ईशाराही भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना दिला.