महादेव बेटिंग अॅप कांड: PMO पासून प्रसार भारतीपर्यंत भूकंप!
गेल्या 48 तासांपासून सोशल मीडियावर तीन नावे जोरदार ट्रेंड होत आहेत, पण टीव्ही चॅनेल्स मात्र पूर्ण शांत - जणू काही घडलेच नाही!
ही नावे म्हणजे - हिरेन जोशी (PMO), हितेश जैन (कायदा आयोग), नवनीत सहगल (प्रसार भारती). शेवटी कारण काय?
🔥 महादेव बेटिंग अॅप म्हणजे काय?
दुबईहून चालवल्या जाणाऱ्या या ऑनलाइन सट्टेबाजी अॅपने गेल्या 4 वर्षांत 50,000+ कोटी रुपयांचा व्यवहार केला.
ED-CBI च्या तपासात उघड झाले की अॅपचे मालक सौरभ चंद्राकर आणि रवि उप्पल यांनी छत्तीसगडपासून गोवा-दुबईपर्यंत अनेक नेते, पोलिस आणि मोठ्या अधिकाऱ्यांना हवाला मार्फत पैसे वाटले.
बॉलिवूड सेलेब्सच्या लग्नांचे स्पॉन्सरशिपपर्यंत त्यांनी केली!
आणि आता या तपासाची धग दिल्लीपर्यंत पोहोचली असून सर्वात मोठे नाव पुढे आले आहे - PMO चे OSD हिरेन जोशी!
1️⃣ हिरेन जोशी (PMO - OSD)
मोदींचे सर्वाधिक जवळचे आणि गुजरातपासून त्यांचे मीडिया मॅनेजमेंट हाताळणारे “डावे हात”.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या कागदपत्रे व चॅट्सनुसार -
दुबईतून महादेव अॅपच्या मालकांकडून मोठी रक्कम मिळत होती, असे दावे.
परदेशी डील्स, मीडिया-चॅनेल मॅनेजमेंट आणि “नॅरेटिव्ह सेटिंग”च्या बदल्यात कमिशन घेतल्याचे आरोप.
नाव बाहेर येताच अचानक राजीनामा → जबाबदारी अश्विनी वैष्णव यांच्याकडे सोपवून गायब!
2️⃣ हितेश जैन (कायदा आयोग सदस्य)
एप्रिल 2025 मध्ये नियुक्ती, आणि ऑक्टोबर अखेर अचानक राजीनामा!
जोशींचे जवळचे मानले जातात.
सोशल मीडियावरील चर्चेनुसार - कायदा आयोगाच्या माध्यमातून बेटिंग कायद्यांमध्ये शिथिलता आणण्याचा प्रयत्न.
राजीनाम्यानंतर बंगला एका दिवसात रिकामा!
3️⃣ नवनीत सहगल (प्रसार भारती चेअरमन)
२ डिसेंबरला अचानक राजीनामा, जेव्हा एक वर्षाचा कार्यकाळ बाकी होता.
UP मधील सर्व मुख्यमंत्री यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे सहगल.
त्यांची नेमकी भूमिका काय, यावर अद्याप स्पष्टता नाही - पण नाव चर्चेत.
सोशल मीडियावर #MahadevBettingScam आणि #HirenJoshi जोरदार ट्रेंड.
लोकांचा सवाल:
PMOमध्ये बसलेला व्यक्तीच जर बेटिंग माफियाशी जोडला असेल तर देशाच्या सुरक्षेचे काय?
५०,००० कोटींचा काळा व्यवहार… आणि टीव्ही चॅनेल्स मात्र शांत का?
विरोधक आक्रमक:
म्हणाले:
“CBI चौकशी व्हावी. हिरेन जोशींचे अमेरिकेतील पार्टनर कोण? किती पैसा आला?”
पण देशातील बहुतेक टीव्ही चॅनेल्स शांत —
कारण जोशीजींच्या “कंट्रोल”खाली ते वर्षानुवर्षे राहिले असल्याचा आरोप!
अश्याप्रकारची माहिती शोशल मिडिया वर प्रचंड व्हारल होत असताना,CBI,PMO office नेमके काय करत आहे ते नेमकी कोणाची वाट पाहत आहेत नेमका काय प्रकार आहे आणि हे काय चालू आहे भारतात हे सर्व सामान्य नागरिकांना माहिती होणे आवश्यक आहे याबाबत माननीय प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी लक्ष घालून अश्या गंभीर प्रकरणाची संपुर्ण माहिती घेवून दोषीवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
'बिगबुल'या सिनेमाची आठवण झाली
या सिनेमा मध्ये PMO office मधील असलेले धागेदोरे समोर आले होते कायद्याच्या कसोटीत घोटाळा आहे की कायद्याची पळवाट होती यावर सिनेमामध्ये खडाजंगी दाखवली आणि शेवटी त्याचा मृत्यु..!
याही प्रकरणात खालपासून वर पर्यंत सर्वांना पैश्याचे वाटप झाल्याची माहिती उघड शोशल मिडिया वर फिरत आहे त्यात आता हा फोटो म्हणजे नेमके काय समजायचे?
