मटका जुगारावर धाड;दोघांजणांनवर गुन्हा दाखल
पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची विवेकानंद पोलीस ठाणे हद्दीत कारवाई
मटका जुगार अवैध खेळताना व खेळविताना व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल.एकूण 48,600/ रुपयेचा मुद्देमाल जप्त.लातूर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची विवेकानंद पोलीस ठाणे हद्दीत कारवाई.*
लातूर शहरामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या मटका जुगार अवैध खेळताना व खेळविताना मिळून आल्याने लातूर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली असून, या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 48,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री.मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. आयुब शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाला दि. 10 डिसेंबर 2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, विवेकानंद पोलीस ठाणे हद्दीतील बनसोडे नगर, अंबाजोगाई रोड लातूर येथे अवैध सुरू असलेल्या मटका जुगार कारवाई करत छापेमारी केली. सदर छापे मारीत
1.शेख युनूस अब्दुल गणी राहणार पठाण नगर लातूर.
2.सूर्यकांत मारुती बनसोडे राहणार बनसोडे नगर लातूर. हे व्यक्ती मटका जुगार चालवीत असताना वर नमूद रक्कम व जुगाराचे साहित्यसह मिळून आल्याने त्यांच्यावर पोलीस ठाणे विवेकानंद चौक लातूर येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे.सदरचा मटका जुगार खेळामधून मिळालेली ठराविक रक्कम भालचंद्र गिरी यास देत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
या कारवाईत एकूण 48600/- रोख रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाणे, लातूर येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. आयुब शेख यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उत्तम जाधव, पोलीस अंमलदार युसुफ शेख, रामहरी भोसले, यशवंत घुगे, दीपक वैष्णव यांनी केली आहे.
Tags:
LATUR
