Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

जिल्हाधिकारी साहेब लक्ष द्या.....जिल्हाधिकारी यांच्या एन. ए.वर केल्या बनावट सह्या..

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
जिल्हाधिकारी साहेब लक्ष द्या.....जिल्हाधिकारी यांच्या एन. ए.वर केल्या बनावट सह्या..
अबब...बनावट एन. ए. च्या आधारे बॅंकेकडून ३ कोटी २५ लाख रूपयांचे कर्ज




जिल्हाधिकारी साहेब लक्ष द्या.....
जिल्हाधिकारी यांच्या एन. ए.वर बनावट सह्या केल्याचा प्रकार काही नविन नसून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी अशा प्रकारच्या टोळीला वर गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्यानंतर आता त्यांच्या बदली नंतर पुन्हा एकदा असा प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे या प्रकारात बनावट सह्यासहित,बनावट सिक्के आणि चक्क बनावट चलनही भरण्यात आले आहे.यावरून ही टोळी किती खोलवर काम करतय याचा आंदाज येत आहे.वेळीच या गोष्टी कडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष नाही दिले तर त्यांच्याही बनावट सह्या मारुन प्रकरण सीमोर आल्यास नवल वाटायला नको..! परंतू याची दुसरी बाजू पण पाहने गरजेचे आहे ते म्हणजे पकडल्या गेले तर..बनावट आणि नाही पकडले तर सत्यप्रत म्हणजे पैशे घेवून काम करायचे आणि प्रकरण उघड होत असेल तर बनावट म्हणून सांगून हात झटकायचे असा तर प्रकार तर नाही ना...! देव करो नसो..नाहितर उच्चपदावरचा विश्वास तात्काळ उडून जाईल.
आता सर्वसामान्य नागरिकांना बनावट आणि सत्यप्रत कोणाला म्हणावे हेच समजत नसून यामुळे दोन्ही बाजूने नागरिकांचे मात्र आर्थिक पिळवणूक होत आहे.आता अशा जिल्हाधिकारी यांच्या सहीला सत्यप्रमाण नेमके कसे ओळखायचे ...? याचे उत्तर सध्यातरी नाही असेच आहे.

लातूर : लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या खोट्या सह्या करून बनावट एन. ए. (अकृषी) आदेश काढून खोटे चलन बनवून, खोटे शिक्के तयार करून, कर्ज घेऊन फसवणूक झाल्या प्रकाराची चौकशी करून संबंधीतांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ता मलिकार्जुन भाईकट्टी यांनी केली आहे.

लातूर शहरानजीक कोळपा शिवारातील गट नं. १२९ (४७०.५४ चौ. मी.), गट नं. १२६ (४१०३.०८ चौ. मी.) शेतजमीनीचे जिल्हाधिकारी यांच्या बनावट सह्या करून एन. ए. करण्यात आला. ३०.४० लाख रूपये किंमत

असलेल्या जमिनीचे मुल्य एन.ए. (खोटे) केल्याने किंमत वाढली. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची खोटी सही केली, खोटे शिक्के बनविले. बनावट नोंदीनुसार चलन भरले, खोटा अकृषी आदेश तयार केला, बनावट एन. ए. च्या आधारे एसबीआयकडून ३ कोटी २५ लाख रूपयांचे कर्ज काढून अनेकांची फसवणूक केली, म्हणून नवलकिशोर भगवानदास सारडा यांच्या विरोधात व त्यांना बनावट कृत्य करण्यास सहभागी असलेल्या सर्वसंबंधीत अधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी मलीकार्जून भाईकट्टी यांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post