Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने, लातूर पोलीस दलाच्या वतीने जादूटोणाविरोधी कायदा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने, लातूर पोलीस दलाच्या वतीने जादूटोणाविरोधी कायदा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन.




                 जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीच्या सहकार्याने लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांच्यासह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रकाश घादगीने (राज्य कार्यकारी समिती सदस्य) नंदनी जाधव (राज्य कार्यकारी समिती सदस्य) वसंतराव टेकांळे (राज्य वैज्ञानिक जाणीव प्रकल्प) यांच्यासह लातूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे इतर सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.
                  महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा उच्चाटन कायदा- 2013 या कायद्याला महाराष्ट्र सरकारने संमती देऊन दहा वर्षे पूर्ण झाले निमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने आयोजित कार्यशाळेत पुणे येथील राज्य कार्यकारी समितीच्या सदस्या नंदनी जाधव यांनी नमूद कायद्यातील कलमे व परिशिष्टे बाबत मार्गदर्शन केले.जादूटोणा विरोधी संपूर्ण कायद्यातील कलमे सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले. 
                  तसेच सदर कार्यशाळेत उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी कायद्याची अंमलबजावणी करीत असताना आलेले अनुभव कथन केले .

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post