Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

एक देश एक निवडणुकीसाठी केंद्राची समिती स्थापन

एक देश एक निवडणुकीसाठी केंद्राची समिती स्थापन

 केंद्र सरकारने एक देश एक निवडणूक यासाठी समिती स्थापन केली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. याची अधिसूचना शुक्रवारी जारी होण्याची शक्यता आहे. केंद्राने स्थापन केलेली समिती वन नेशन वन इलेक्शनच्या कायदेशीर बाबी पाहणार आहे. शिवाय यासाठी सर्वसामान्यांचे मतही घेतले जाणार आहे. केंद्र सरकारने १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. एक देश, एक निवडणूक यावरही सरकार विधेयक आणण्याची शक्यता आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, सरकारला अचानक एक देश एक निवडणुकीची गरज का पडली? दुसरीकडे, काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव म्हणाले यांनी याचे स्वागत केले असून ते म्हणाले की, वैयक्तिकरीत्या मी एक देश एक निवडणुकीचे स्वागत करतो. ही नवीन कल्पना नाही, जुनी कल्पना आहे. दरम्यान, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा कोविंद यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. मात्र, या भेटीचे कारण समोर आलेले नाही.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post