Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर एमआयटीत उत्साहात प्रजासत्‍ताक दिन आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण

लातूर एमआयटीत उत्साहात प्रजासत्‍ताक दिन . रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण

जनाबाई शेप पुरस्कार देऊन नामदेव राख या विद्यार्थ्यांचा गौरव





           लातूर दि.२६ - भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माईर्स एमआयटी वैद्यकीय शैक्षणिक संकुल, लातूर येथे गुरुवार दि. २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.२० वाजता लातूर एमआयटीचे कार्यकारी संचालक तथा विधानपरिषदेचे सदस्य आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी पुरस्कार वितरणासह उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

            प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस आ. रमेशअप्पा कराड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वैद्यकीय शिक्षण प्रथम वर्षाच्या परीक्षेत महाविद्यालयातून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास माणिक शेप यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा जनाबाई ग्यानबा शेप हा पुरस्कार नामदेव राख यास आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर लातूर एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. अपर्णा अस्था, डॉ अभिजीत रायते, डॉ. रवी ईरपतगिरे, डॉ. बस्वराज वारद, आणि डॉ. सचिन इंगळे यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना वेगवेगळ्या संस्थांच्या वतीने पुरस्कार देण्यात आले होते. या सर्व उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य विद्यापीठाच्या खो खो संघाच्या कर्णधारपदी एमआयटी लातूर फिजिओथेरपी महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतीक्षा गांगुडे हिची निवड झाल्याबद्दल आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

        याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. पी. जमादार, उपअधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, शैक्षणिक संचालक डॉ. चंद्रकांत शिरोळे, प्रशासकीय संचालिक डॉ. सरिता मंत्री, फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पल्लवी जाधव, नर्सींग महाविद्यालयाचे प्राचार्य सरवनन, दंत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. यतीश जोशी, मुख्य प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे, रुग्णालय अधीक्षक डॉ. चंद्रकला पाटील, रुग्णालय प्रशासकीय अधिकारी श्रीपती मुंडे, डॉ. अरुणकुमार राव, डॉ. विद्या कांदे, डॉ. मुकुंद भिसे, डॉ. एस एस कुलकर्णी, डॉ. आशा पिचारे, डॉ. फिरोज पठाण, डॉ. एन व्ही कुलकर्णी, डॉ. गजानन गोंधळी, डॉ. शैला बांगड, डॉ. मालू, डॉ. कारंडे, श्री. मधुकर गुट्टे यांच्यासह एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, फिजीओथेरपी महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर, विद्यार्थी, पालक व नागरीक ध्वजारोहन कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post