Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामी विरोधात पिंपरी-चिंचवड बंद

महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामी विरोधात  पिंपरी-चिंचवड बंद
छत्रपती संभाजीराजे होणार सहभागी

पुणे/सह-संपादक-दादाराव कांबळे




पिंपरी चिंचवड-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या बदनामीकारक वक्तव्याच्या विरोधात गुरुवारी सकाळी 7 ते 5 पर्य़ंत शहर बंदचे आवाहन करण्यात आले असून शहरातील सर्व नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे,
असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत पिंपरी चौकात धरणे आंदोलन केले जाणार आहे.
तसेच शहरातील विविध संस्थांचे कार्यकर्ते रॅलीद्वारे याठिकाणी जमणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यावरुन राज्यात राजकीय वादंग पेटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह बहुजन समाजाच्या महापुरुषांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ विविध संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांनी गुरुवार दि.8डिसेंबर रोजी पिंपरी-चिंचवड शहर बंदचे 
 आवाहन केले आहे. पिंपरी चिंचवड बंदमध्ये कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे सहभागी होणार आहेत.

 महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामी विरोधात विविध राजकीय पक्ष व संघटना यांनी पिंपरी चिंचवड बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये संभाजीराजे दुपारी 12 वाजता पिंपरी येथे सहभागी होणार असल्याची माहिती बहुजन महापुरुष समितीच्या समन्वयक यांनी दिली आहे.

गुरुवारी सकाळी 7 ते 5 पर्य़ंत शहर बंदचे आवाहन करण्यात आले असून शहरातील सर्व नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे,
असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत पिंपरी चौकात धरणे आंदोलन केले जाणार आहे.
तसेच शहरातील विविध संस्थांचे कार्यकर्ते रॅलीद्वारे याठिकाणी जमणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.



Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post