Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांच्या पुढाकारातून पोलिसांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

      Ads by Eonads
    पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांच्या पुढाकारातून पोलिसांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन.
123 पोलीस अधिकारी व 1934 पोलीस अमलदारांची होणार आरोग्य तपासणी






                लातूर- कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करताना,गुन्ह्यांचा तपास, आंदोलने,मोर्चे,व्हीआयपींचे दौरे,गस्त यामुळे पोलिसांना जास्त वेळ कर्तव्य बजवावे लागते. या कारणाने त्यांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक श्री. लक्ष्मणराव देशमुख यांच्याशी चर्चा व पत्रव्यवहार करून लातूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर असलेले 123 पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस अधीक्षक दर्जाचे पोलीस अधिकारी व 1934 पोलीस अमलदारांची आरोग्य तपासणी 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणार असून यामध्ये पोलिसांचे रक्तदाब, मधुमेह, बीएमआय, ई.सी.जी, लिपिड प्रोफाईल यासारख्या विविध चाचण्या करण्यात करण्यात येणार आहे. पोलिसांच्या आरोग्य विषयक गंभीर समस्याचा वेळीच निराकरण व औषधोपचार होणार असून आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
            लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण येतो. अनेकदा पंधरा ते सोळा तास काम करावे लागते. जागरण, अवेळी जेवण यामुळे व्याधी जडतात. पोलिसांनी निरोगी राहावे या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे संकल्पनेतून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत असून सदरचे शिबिर पाच दिवस चालणार असून पोलीस स्टेशन स्तरावर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात वैद्यकीय सेवा देणारे अधिकारी व कर्मचारी मार्फत पोलिसांची आरोग्य तपासणी होणार आहे.
           सदरचे आरोग्य शिबिर यशश्वी करण्याकरीता अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, पोलीस उपाधीक्षक (गृह )अंगद सुडके यांचे मार्गदर्शनात पोलीस कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे हे परिश्रम घेत असून सदरच्या आरोग्य शिबिरामध्ये तपासणी करून घेणारे पोलीस अधिकारी व अमलदारांची संख्यात्मक माहिती तसेच त्यांची तपासणी अहवालाची माहिती संकलित केली जात असून त्या माहितीवरून पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post