Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

अनैतिक संबंधातून मित्राचा चाकूने भोसकून खून, मृतदेह फेकला नदीपात्रा

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
अनैतिक संबंधातून मित्राचा चाकूने भोसकून खून, मृतदेह फेकला नदीपात्रा



"पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयाने मित्रानेच मित्राचा चाकूने भोसकून खुन केल्याची धक्कादायक घटना लातूरात घडली आहे. खून केल्यानंतर आरोपीने एका ब्लॅंकेटमध्ये दगड आणि मृतदेह गुंडाळून मांजरा नदीपात्रात टाकल्यानंतर 2 दिवसांनी आरोपीने पोलिस ठाण्यात येवून घटनेची कबुली दिली"
लातूर: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयाने मित्रानेच मित्राचा चाकूने भोसकून खुन केल्याची धक्कादायक घटना  लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील मौजे ब्रम्हवाडी येथे घडली असुन खून केल्यानंतर आरोपीने एका ब्लॅंकेटमध्ये दगड आणि मृतदेह गुंडाळून मांजरा नदीपात्रात टाकल्यानंतर 2 दिवसांनी आरोपीने पोलिस स्टेशन मध्ये येवून घटनेची कबुली दिली. विवेकानंद चौक पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण नदीपात्रात फेकलेला मृतदेह अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.

 लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील मौजे ब्रम्हवाडी येथील सुग्रीव अप्पाराव कांबळे (वय ३२) व चाकूर तालुक्यातीलच मौजे आटोळा येथील राम कुमदळे हे दोघे मित्र होते. दोघांनी मिळून काही दिवसांपूर्वी आयशर टेम्पो खरेदी केला होता. तो टेम्पो हे दोघे भाड्याने चालवत होते. एकमेकांच्या घरी येणे- जाणे असल्याने राम कुमदळे याचे सुग्रीवच्या बायकोशी जवळीक निर्माण झाली होती. त्यातून दोघांचे अनैतिक संबंध वाढले. राम हा सतत सुग्रीवच्या बायकोला फोनवर बोलत असल्यामुळे सुग्रीवचा संशय अधिक वाढला होता. त्यातच काही दिवसांपूर्वी टेम्पोच्या भाड्याचे पैसे का खर्च केले म्हणून रामने सुग्रीवच्या घरी जाउन त्याच्या आईला व बायकोला शिवीगाळ केली होती. हे दोन्ही राग सुग्रीवच्या डोक्यात थैमान घालत होते. त्यामुळे सुग्रीवने शुक्रवारच्या ( दि.18 ) सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान रामला गोड बोलून त्या आयशर टेम्पोत बसवले आणि लातूर शहरातील रिंगरोडवरील गोजमगुंडे यांच्या मळ्याजवळ रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा केला. सोबत आणलेल्या चाकुने रामच्या पोटात, तोंडावर गंभीर वार करुन त्याचा टेम्पोमध्ये खून केला. त्यानंतर रामचा मृतदेह एका ब्लॅंकेटमध्ये दगडासह गुंडाळून मौजे चामेवाडी नजिक मांजरा नदीच्या पुलावरुन नदीपात्रात फेकला होता.

नदीत फेकल्याची कबुली:
" या भयानक घटनेची कोणालाच कसलाही खबर नव्हती. पण घटनेला 2 दिवस उलटल्यानंतर रविवारी ( दि.20 ) रात्री आरोपी सुग्रीव कांबळे हा स्वतः शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात आला. आणि रामचा खुन करुन मृतदेह नदीत फेकल्याची कबुली दिली."
 पोलिसांनी त्याच्याच जबाबावरुन गुरनं 644/2022 कलम 302,201 भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला.पोलिसांचा तपास सुरु: गुन्हा दाखल होताच मयत रामचा मृतदेह फेकलेल्या ठिकाणाला शहराचे पोलीस उपाधीक्षक जितेंद्र जगदाळे, विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुधाकर बावकर, सपोनि भाऊसाहेब खंदारे यांनी भेट दिली. 

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post