Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

आयकर कार्यालयात आऊटरिच कार्यक्रम

आयकर कार्यालयात आऊटरिच कार्यक्रम

लातूर /प्रतिनिधी: लातूर येथील आयकर कार्यालयात आऊटरिच हा कार्यक्रम घेण्यात आला.
    नांदेड येथील आयकर अधिकारी प्रदीप पराते,सीए सुनील कोचेटा यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. धर्मादाय संस्था व आयकर कायदा,त्यातील बदल व विवरणपत्रके सादर करण्यासंदर्भात यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.फॉर्म नंबर १० ए भरण्याची तारीख दि.२५ नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
    या कार्यक्रमास लातूरचे आयकर अधिकारी विशालकुमार व संजय पानसरे यांचीही उपस्थिती होती.दि इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस इंडियाच्या लातूर शाखेचे अध्यक्ष सीए द्वारकादास भुतडा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.आयकर निरीक्षक किरण मदने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
   या कार्यक्रमास सीए आर.आर. तापडिया,नवटके,उदय स्वामी, महेश तोष्णीवाल,कुलकर्णी, शकील शेख,रमेश कडने,
डी.पी.व्होरा,बजाज आदींसह शहरातील सीए व टॅक्स प्रॅक्टिशनर्सची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post