Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

ग्रीन लातूर वृक्ष टीमने केले अविरत१२५८ दिवस श्रमदान

888
ग्रीन लातूर वृक्ष टीमने केले अविरत१२५८ दिवस श्रमदान



लातूर-ग्रीन लातूर वृक्ष टीमने आज वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, शहर स्वच्छता, जनजागृती, लोकप्रबोधनाचा अविरत १२५८ वा दिवस पूर्ण करत श्रमदान केले. या अंतर्गत जिल्हाधिकारी निवासस्थान समोरील दुभाजक, बार्शी रोड येथील गवत, केरकचरा काढून स्वच्छ केले, दुभाजकातील केरकचरा काढला, चाफा या फुलझाडांच्या ८२ कलमा दुभाजकात लावल्या, सर्व झाडांना टँकरद्वारे भरपूर पाणी दिले. ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, इम्रान सय्यद, पदमाकर बागल, ऍड वैशाली लोंढे-यादव, सुलेखा कारेपूरकर, दीपाली राजपूत, मनीषा कोकणे, दयाराम सुडे, नागसेन कांबळे, विजय मोहिते, बळीराम दगडे, महेश गेलडा, नितीन पांचाळ, अभिषेक घाडगे, मुकेश लाटे, सिताराम कंजे, शंकरसेन पाटील यांनी स्वच्छता मोहीम करिता परिश्रम घेतले. 
आपला परिसर स्वच्छ ठेवावा, घरातील कचरा दुभाजकात किंवा रस्त्यावर न टाकता घंटागाडीत देण्याचे आवाहन ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सुलेखा कारेपूरकर यांनी केले.
888

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post