Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भक्ती स्थळावरील डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची समाधी उकरण्याचा घाट!

गुन्हेगारीचा पर्दाफाश…
 भक्ती स्थळावरील डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची समाधी उकरण्याचा घाट!
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची समाधी उकरून अस्थी चोरीला जाण्याची विश्वस्त मंडळाला भीती 
लातूरचे जिल्हाधिकारी-जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार !







लातूर : अहमदपूर तालुक्यातील भक्ती स्थळ येथील राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची समाधी उकरून महाराजांच्या अस्थी चोरून नेण्याचा कट काही समाजकंटकांनी रचल्याचा खळबळजनक आरोप भक्ती स्थळ विश्वस्त मंडळाने केलाय. लातूरचे जिल्हाधिकारी यांनी लेखी तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे भक्तीस्थळाला पोलीस संरक्षण देऊन समाधी खोदण्यास, अस्थी बाहेर काढण्यास मनाई करावी. तसेच त्या समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक, कायदेशीर कारवाईची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. 
   राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या महानिर्वाणानंतर अहमदपूर तालुक्यातील भक्ती स्थळ इथे महाराजांची विधिवत समाधी बांधण्यात आली. मात्र महाराजांच्या मृत्यूनंतरही त्याचे भांडवल करण्याचा कट काही समाजकंटक सातत्याने करीत आलेले आहेत. मात्र आता तर महाराजांची भक्ती स्थळावरील समाधी उकरून त्यातील अस्थी पळविण्याचा घाट काही समाजकंटकांनी रचला आहे. त्यातून भक्ती स्थळावरील विद्यमान विश्वस्त मंडळाला बदनाम करण्याचा तसेच इतरत्र समाधी स्थळ बांधण्याचा घाट काही जण आखत आहेत. किंवा अस्थी चोरून नेऊन त्या भंग करायचे मनसुबे काही जण आखत असल्याची माहिती विश्वस्त मंडळाला समजली आहे. 
  त्यामुळे भक्ती स्थळाला पोलीस संरक्षण देऊन समाधी खोदण्यास, अस्थी बाहेर काढण्यास मनाई करावी. तसेच जे कुणी समाजकंटक असा प्रकार करतील त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विश्वस्त पदाधिकारी यांनी लातूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या निवेदनावर माधवराव अण्णाराव बरगे, सुभाष वैजनाथ सराफ, बब्रुवान देवराव हैबतपुरे, व्यंकटराव गंगाधरराव मद्दे, शिवशंकर बळीराम मोरगे, संदीप लक्ष्मणअप्पा डाकुलगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

  राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधीची होणारी संभाव्य विटंबना थांबवावी. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याची विनंतीही भक्ती स्थळ विश्वस्त मंडळाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post