Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

राजमाता जिजामाता संकुलात ‘विघ्नहर्त्या'ची प्रतिष्ठापना

प्राचार्य संगमेश्वर केंद्रे यांच्या हस्ते राजमाता जिजामाता संकुलात ‘विघ्नहर्त्या'ची प्रतिष्ठापना



लातूर : येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात प्राचार्य संगमेश्वर केंद्रे यांच्या हस्ते बुधवारी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा गजर करीत विघ्नहर्त्या श्री गणरायाची विधीवत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी बोलताना संकुलाचे प्रमुख प्राचार्य डी. एन. केंद्रे म्हणाले की, सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी १८९४ साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. टिळकांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी व विचारांची देवाण - घेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला. गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख - समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते.
प्रारंभी संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये व प्राचार्य संगमेश्वर केंद्रे यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली. या प्रसंगी संस्थेच्या विधी सल्लागार राणी केंद्रे, प्रा. अश्विनी केंद्रे, मुख्याध्यापक स्वाती केंद्रे, प्राचार्य जी. आर. मुंडे, राजीव मुंढे, राजेंद्र जायेभाये, प्रा. कविता केंद्रे, शोभा कांबळे, मदन धुमाळ, सुनीता जवळे, पांडुरंग कुलकर्णी, ए. बी. मुंडे, सुधाकर लोहकरे, शिवकांत वाडीकर, परमेश्वर गित्ते, विष्णू कराड आदी उपस्थित होते.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post