Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

अंकिताने'विशेष' सेवा देण्यास नकार दिल्याने तिची निर्घूण हत्या

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
अंकिताने'विशेष' सेवा देण्यास नकार दिल्याने तिची निर्घूण हत्या
आरोपी ला फाशीची मागणी..
श्रीनगर मेडिकल कॉलेज समोर नागरिकांची गर्दी



हरिद्वार/देहरादून : उत्तराखंडमधील ज्येष्ठ भाजपा नेते विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्य यास त्याच्याच रिसॉर्टवर
स्वागतिका म्हणून काम करणाऱ्या १९ वर्षीय अंकिता भंडारी हिची हत्या केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. तिने 'विशेष सेवा' देण्यास नकार दिल्याने भाजप नेत्याच्या मुलाला अटक करण्यात आली असुन या प्रकरणी श्रिनगर मेडिकल कॉलेज समोर नागरिकांची गर्दी जमली होती.दि 25सप्टेंबर रोजी बद्रीनाथ हायवे पुर्णपने जाम करण्यात आला.अंतिम संस्कार करण्यास नातेवाईकांनी नकार दिला 
पोलिस गर्दी हटवण्याचा प्रयत्न करत आहे
 काय आहे हे प्रकरण..




■मिळालेल्या माहिती नुसार अंकिताच्या एका फेसबुक फ्रेंडने सांगितले होते की, या मुलीने अतिथींसोबत संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आली. ती ज्या रिसॉर्टमध्ये काम करते त्याच्या मालकाने तिला असे करण्यास सांगितले होते, असा दावाही या मित्राने केला आहे. ज्या रात्री तिची हत्या करण्यात आली त्या रात्रीच तिने फोन करून सांगितले होते की, ती अडचणीत आहे.

मुलीशी संपर्क न झाल्याने रिसॉर्टचे मालक पुलकित आर्य यांना फोन केला. त्यांनी सांगितले की, ती झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेली आहे. दुसऱ्या दिवशी आपण आर्य यांना फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा फोन बंद होता. मुलीचा मृतदेह जवळच्याच एका कालव्यात सापडला आहे.
घटना घडली ते ठिकाण हृषिकेशपासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे. सोशल मीडियात हे प्रकरण मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पुलकितला अटक करण्यात आली आहे.
 हत्या करण्यात आली. नंतर पोलीस व प्रशासनाने हा रिसॉर्ट बुल्डोजर घालून रातोरात पाडून टाकला आहे. उत्तराखंडमधील पौड़ी

जिल्ह्यातील यमकेश्वर येथे हा रिसॉर्ट आहे. ही तरुणी सोमवारपासून बेपत्ता होती. त्याबाबत पुलकित आर्यने स्वतःच फिर्याद देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तिच्या कुटुंबीयांनी मात्र पुलकितवर संशय व्यक्त केला. नंतर शुक्रवारी पोलिसांनी पुलकित आणि त्याच्या २ कर्मचाऱ्यांना अटक केली. रिसॉर्टचा व्यवस्थापक सौरभ भास्कर आणि सहायक व्यवस्थापक अंकित गुप्ता है अन्य दोन आरोपी आहेत. आरोपींना न्यायालयात घेऊन जात असताना स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या वाहनास घेराव घातला तसेच आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. उपाध्यक्ष आहे.मुलीचा मृतदेह जवळच्याच एका कालव्यात सापडला आहे. घटना घडली ते ठिकाण हृषिकेशपासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे. सोशल मीडियात हे प्रकरण मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पुलकितला अटक करण्यात आली आहे. पुलकित हा भाजपा आणि आरएसएसशी संबंधित असल्यामुळे त्याला अटक करण्यात येत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी फैला होता.

पुलकित आर्य याचे वडील विनोद आर्य हे उत्तराखंडमध्ये मंत्रिपदाचा दर्जा असलेले भाजपा नेते आहेत. आधी ते मंत्रीही होते. उत्तराखंड माटी कला बोर्डाचे ते अध्यक्ष होते. पुलकितचा भाऊ अंकित आर्य हासुद्धा भाजपाचा नेता असून पुलकित आर्यच्या अटकेनंतर त्याचे वडील विनोद आर्य याना भाजपातून निलंबित करण्यात आले आहे. पुलकित याचा भाऊ अंकित आर्य यालाही भाजपामधून काढण्यात आले आहे. भाजपाचे माध्यम प्रभारी मनवीर चौहान यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले की, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांच्या निर्देशानंतर विनोद आर्य व अंकित यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पुलकीत आर्य याच्या याच रिसॉर्टवर बुलडोझर चालविण्यात आला.
राज्यातील ओबीसी आयोगाचा
 वनांतर रिसॉर्ट असलेला भाग नियमित पोलिसांच्या हद्दीत येत नाही. नियमानुसार, स्थानिक तलाठ्याने एफआयआर नोंदवून नंतर काल जिल्हाधिकाऱ्यांनी तो पोलिसांकडे हस्तांतरित केला. त्यानंतर आम्ही २४ तासांच्या आत कारवाई केली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने आर्य यांच्या मालकीचा रिसॉर्ट बुल्डोअर घालून शुक्रवारी रात्री पाहून टाकला. 

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post