शिक्षण म्हणजे ज्ञान योग्य आचरण तांत्रिक प्रवीणता . शिक्षण ही व्यक्तीची अंतर्निहित क्षमता आणि व्यक्तिमत्त्व विकसित करण्याची प्रक्रिया आहे ,ही प्रक्रिया त्याला समाजात प्रौढ व्यक्तीची भूमिका बजावण्यासाठी सामाजिक बनवते आणि व्यक्तीला समाजाचा सदस्य आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्य प्रदान करते. त्यामुळे देशाची परिस्थिति सुधारण्यासाठी शिक्षण असणे ही अतिशय महत्त्वाचे मानले जाते. परंतु सध्या आणि बऱ्याच वर्षापासून राजकारणामध्ये शिक्षणाचा कायमच अभाव दिसतो त्याचा परिणाम देशातील नागरिकांना भोगावा लागतो. चुकीच्या पद्धतीने शासकीय योजना राबवल्यामुळे देश अधोगतीकडे वाटचाल करतो. आज आपल्या देशाची परिस्थिती पाहिली असता बेरोजगारी, पेट्रोल डिझेलचे वाढते प्रमाण ज्यावर नियंत्रण मिळवण्यास आलेले आपयश हे नेत्यांमधील अशिक्षितेचे प्रमाण आहे . बऱ्याच वेळेस राजकारणामध्ये शिक्षणाला कमी आणि गुंडगिरी दडपशाही गुन्हे दाखल असणाऱ्या मोठे केले जाते आणि पुढे चालून तेच अशिक्षित कार्यकर्ते आमदार-खासदार आणि किंबहुना पंतप्रधान, मुख्यमंत्रीही झाले आहेत. बऱ्याच वेळेस या राजकारणात तोडफोडीचे राजकारण करून सामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते. सध्या चालू असलेल्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ९०%प्रमाण हे अशिक्षित आमदार-खासदार असल्यामुळे, कधी या पक्षात तर कधी त्या पक्षात त्यांचे भ्रमण चालू असते .आणि संख्याबळाच्या जोरावर ते पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या खुर्चीवर जाऊन बसतात .पुढे चालून ते देशासाठी अतिशय घातक ठरतात. कोणत्या योजनेवर किती आणि कसा पैसा खर्च करावा लागतो याचे नियोजन आणि पुरेशी माहिती नसल्यामुळे बऱ्याच योजना बंद पडतात,त्या मध्ये सर्वसामान्यांचा पैसा भुगतो,आणि मग देशाला कर्ज काढावे लागते. देशात घेण्यात आलेला नोटबंदीचा निर्णय हा फक्त राजकीय हेतूने घेतल्यामुळे तो सपशेल फेल गेला व त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर प्रचंड प्रमाणात दिसून आला .आता याला जबाबदार व्यक्ती नसून शिक्षणाचा अभाव आहे. आता तर महाराष्ट्रात ही शिक्षणाचा अभाव असलेल्यांची सरशी झाली आहे. त्यामुळे आता राजकारणात किमान शिक्षणाची अट घालण्यासाठी तसा कायदा संमत करावा. महाराष्ट्रात प्रस्थापित आमदारांची शैक्षणिक पात्रता बघितल्यास राज्याची सर्वसाधारण स्थिती अशी का आणि पण कोणाच्या हाती राज्य सोपविले आहे? याची कल्पना येते. ते जरी अल्पशिक्षित असले तरी कुर्हाडी वर लाथ मारणे इतके काही आपले आमदार-खासदार मूर्ख नाहीत त्यामुळे वैयक्तिक त्यांची आणि त्यानंतर त्यांच्या मुलाबाळांची गादी सुरक्षित राहण्यासाठी शिक्षणाची किमान अट घालणारा कायदा कधी संमत होऊ देणार नाहीत.आपले सर्व केंद्रीय मंत्री सुद्धा शिकलेले आहेत असे समजू नका जे फारसे शिकलेले नाहित त्यांनी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही सामाजिक कायदामंत्री पदावर कार्य केले, असो परंतु सध्याची परिस्थिती मात्र देश "चहा"वाला आणि महाराष्ट्र"आटो"वाला चालवतो अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. याला जबाबदार सर्वसामान्य नागरिकच किंवा मतदान करणारे मानले जाते. शेवटी सर्वसामान्य नागरिकांवर याची जबाबदारी येऊन पडते