Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

आरोग्य आणि शाश्वत पाण्यापासून लातूरकर वंचित..! पिण्याच्या पाण्याचे गाजर..! पाच हजार करोड रुपयांच्या विकास कामात शाश्वत पाण्यासाठी एक छदामही नाही.

आरोग्य आणि शाश्वत पाण्यापासून लातूरकर वंचित..! 

पिण्याच्या पाण्याचे गाजर..! 
पाच हजार करोड रुपयांच्या विकास कामात शाश्वत पाण्यासाठी एक छदामही नाही.


 लातूर-लातूर मधील राजकारणात पाण्याचा प्रश्न हा कायम चर्चिला जातो त्यावर ठोस उपाययोजना मात्र केव्हाही केली जात नाही याला मूळ कारण म्हणजे काम करण्याची इच्छाशक्तीचा अभाव दिसत आहे. किंबहुना त्यांना ते करायचेचं नाही हे आता चित्र स्पष्ट होत आहे दिनांक 29 जुलै रोजी माननीय अमित विलासराव देशमुख यांनी पाच हजार करोड रुपयांच्या विकास कामाचा उद्घाटन समारंभवरून पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी लातूर जिल्ह्यासाठी सन 2019 ते 2022 या काळात500 करोडो रुपयाचा निधी घेतला असून त्यातील बहुतांश रक्कम खर्च झाली असल्याचे सांगितले आहे ,त्यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून 754 कोटी, अनुसूचित जाती जमाती विकास यासाठी 373 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभाग 840 कोटी, जलसंपदा विभागासाठी सतराशे 51 कोटी, लातूर मनपा साठी 232 कोटी,चा समावेश आहे जिल्हा रुग्णालयासाठी 120 कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आणि त्या सोबत रुग्णालयाच्या जागेसाठी कृषी महाविद्यालयाची जागेचे हस्तांतरण शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगितले परंतु या सर्व निधीमध्ये शाश्वत पाण्यासाठी एक छदामही निधी दिसून येत नाही पवार पेट्रोल माननीय विलासराव देशमुख यांनी आपल्या वक्तृत्व शैलीन लातूरकरांची मने जिंकली परंतु आज त्याच वक्‍तृत्व शैलीचा वापर मात्र अमित विलासराव देशमुख हे आपले शब्द फिरण्यासाठी वापरतात हे दुर्दैव लातूरकरांच्या वाटेला आले आहे असे दिसत आहे. 
आरोग्य विभागाला जागा मिळत नसल्याचे जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मागील बारा वर्षापासून रेंगाळला होता परंतु कोविडच्या काळात मात्र या रुग्णालयाची आवश्यकता दिसून आल्यामुळे पुन्हा हा विषय गांभीर्याने लातूरकरांनी चर्चिला होता त्यानंतर शासनाकडून रुग्णालयासाठी मंजुरी मिळाली खरी परंतु कृषी महाविद्यालयाची हा न्यायालयात गेल्यामुळे जागा हस्तांतरणाच्या प्रश्न रखडलेला आहे लातूरकर आरोग्य सेवेपासून वंचित आहेत शिवाय पाणी आणण्याचा प्रस्तावही आता लालफितीत धूळ खात पडलेला आहे.
 2016 मध्ये लातूर शहरांमध्ये अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती रेल्वेने पाणी आणावे लागले या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा करण्यासाठी उजनीतून पाणी आणण्याची पर्याय व्यवस्था करावी यासाठी मनपाने प्रस्ताव पाठवला होता ,जवळपास सहा वर्षे उलटली तरी उजनीच्या पाण्याचा थेंबही लातूर करांना आलेला नाही चक्क अमित विलासराव देशमुख यांनी "उजनीचे पाणी विसरा" असे संकेत दिल्यामुळे आरोग्य आणि शाश्वत पाण्यापासून लातूरकर कायमचेच वंचित राहणार की काय? असा प्रश्न आता लातूरकरांना पडला आहे परंतु शहराच्या चारही बाजूने कारखाने मात्र ढिगभर होत आहेत आणि आता तर दुसरे नेतेही या कारखानदारी मध्ये उतरले असून कारखाने "पाणी "नसताना पाण्यावर चालतात की हवेवर? हा प्रश्न निर्माण झाला आहे का..पिण्याचे पाणी कारखान्यांना देवून,लातूर करांना वेठीस धरले जात आहे?असे लातूरांना वाटू लागले आहे. त्यामुळे हे राजकारणी कायमच लातूरकरांना फसवत असून वेळोवेळी पाण्याचे गाजर दाखवून आपली पोळी भाजत असल्याचे आता चित्र स्पष्ट होत आहे

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post