Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

गुन्हेगारीचा पर्दाफाश….! जाहिरातीच्या नावाखाली पैशाची मागणी केल्याप्रकरणी पत्रकारास अट

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!

जाहिरातीच्या नावाखाली पैशाची मागणी केल्याप्रकरणी पत्रकारास अटक.


    या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, "बातमी मागची बातमी" न्यूज पेपरचे संपादक जावेद शेख यांनी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांना ते संपादक असलेल्या "बातमी मागची बातमी" या न्यूज पेपर साठी जाहिरातीच्या किमतीचे दर पत्रक व्हाट्सअपवर पाठवून व फोन करून पोलिस अधीक्षकांच्या व पोलीस खात्याचे विरोधात हेतुपूर्वक मीठ-मिर्च लावून बदनाम कारक बातम्यांना न छापण्यासाठी जाहिरातीच्या नावाखाली पंचवीस हजार रुपयांची मागणी करून तडजोडी अंती दहा हजार रुपये स्वतः स्वीकारले म्हणून पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे शिवाजी नगर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 78/2022 कलम 384, 385 भादवी 



अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             दाखल झालेल्या गुन्ह्यात जावेद शेख यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
              जावेद शेख यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तू मधून अशा प्रकारच्या इतर घटनांचा व संशयास्पद बाबींचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे. पोलीस सखोल तपास करीत आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन शिवाजीनगर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील हे करीत आहेत.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post