ना परवानगी, ना लायसन्स...!
दिवसाढवळ्या चालते अनधिकृत "ताडी" दुकान
लातूर-
बुधोड्या पासून एक किलोमीटर अंतरावर एका शेतात रोडच्या कडेला 200 मीटर अंतरावर पत्र्याचे शेड मारून अनधिकृत ताडी दुकान चालू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून,
दारूबंदी विभागाचे पोलीस अधीक्षक बारगजे यांना विचारणा केली असता अशा कोणत्याही प्रकारची लायसन्स अथवा परवानगी आमच्या कार्यालयाकडून देण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तर आम्ही लवकरच त्यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन त्यांनी दिले खरे परंतु काही महिन्यापासून हे ताडी दुकान चालू असून दिवसाढवळ्या नागरिकांचे जीव धोक्यात घालत आहेत . सध्या आजूबाजू परिसरात ताडीचे झाडें नसल्यामुळे त्यामध्ये घातक रसायनयुक्त ताडी सध्या वापरली जाऊ लागल्याची माहिती मिळत आहे. अशा घातक रसायनयुक्त ताडीमुळे पिणार्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो, किंबहुना मृत्यूही ओढावतो परंतू पैशापुढे याकडे कुणाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे."हप्तेखोर" अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करत आहेत. चार पदरी रोडच्या लगत रस्त्याला लागून असे अवैध ताडी दुकान दिवसाढवळ्या चालत असेल आणि त्यावर कारवाई साठी कोणताही अधिकारी पुढे येत नसेल तर, ताडी पिणाऱ्या ना आता "देव"च वाचू शकेल.अशी तीव्र भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.